जिल्हा निर्मितीनंतरही पालघरचे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरीतच

पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन आज ७ वर्षे पूर्ण झाली. तरीही येथील अनेक प्रश्न होते तसेच असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. गरजू ग्रामीण जनतेला सहजसाध्य, परवडण्याजोगी आरोग्य सेवा जिल्हा निर्मिती झाल्यानंतरही उपलब्ध झालेली नाही.
Palghar ZP
Palghar ZP


विरार : पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन आज ७ वर्षे पूर्ण झाली. (seven years before Palghar made a seprate district) तरीही येथील अनेक प्रश्न होते तसेच असल्याचे चित्र आहे.  (But yet various issue inclueding health is as it is) प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न मोठा आहे.  (Health is a big issue here) गरजूंना सहजसाध्य, परवडण्याजोगी आरोग्य सेवा जिल्हा निर्मिती झाल्यानंतरही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण आजही उपचारासाठी गुजरातला (People goes to Gujrat for medical treatment) जातात. 

पालघर जिल्हा निर्माण झाल्यानंतर कुपोषण, मालमृत्यू, मातामृत्यू अशी आरोग्य सेवेची आव्हाने समोर होती. आरोग्यसेवेवर भर देण्यात येथील लोकप्रतिनिधींचा अभाव दिसतो. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती व बालकांच्या उपचाराच्या दृष्टीने यंत्रसामुग्री उपलब्ध केली जात असली तरीही इतर आजार, हाडाचे विकार, लहान- मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात पुरेशी सामुग्री व तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना खासगी, सेवाभावी किंवा मुंबईच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल जातो. जिल्ह्याचा वेशीवर असलेले सेलवास, वापी- वलसाड व वेळप्रसंगी सुरत येथे अत्यल्प दरात शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना जावे लागते. 

जिल्ह्याला सर्व सोयी व सुविधायुक्त एकही रुग्णालय नाही. मनोर येथे २०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. तरीही रुग्णालय कार्यरत होण्यास  दोन- तीन वर्षाचा अवधी लागणार आहे. या दरम्यान एखादी दुर्घटना किंवा गंभीर अपघातातील तसेच गरोदर माताची गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागते आहे. 

शासकीय रुग्णालये अशा अनेकविध आजारांच्या उच्चाटनासाठी उभारली असली, तरीही येथे यंत्रणांचा अभाव दिसून येतो. हा अभाव दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक आहे. हे विषय फक्त निवडणुकीपूरते चर्चेला येतात. मात्र येथील नागरीक उपचारासाठी आजही जिल्ह्याबाहेरची वाट धरतात ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आजही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात जाण्यासाठी रस्ते नसल्याने आजारी माणसाला डोलीत घालून रुग्णालयात आणावे लागत आहे. 

पालघर जिल्ह्यासाठी सिडकोमध्ये दहा एकर जागेत जिल्हा रुग्णालय प्रस्तावित आहे. हे रुग्णालय मंजूर असले तरी विभाजनाच्या सहा वर्षानंतर देखील हे काम सुरू झालेले नाही. रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी पंचवीस जागा अपेक्षित आहे. मात्र हा प्रस्ताव देखील लालफितीत अडकून आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत होणारे अपघात, त्यातील जखमी व मृत्यूंची संख्या लक्षात घेता तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यासाठी दोनशे बेडचे ट्रामा केअर सेंटर मनोर येथे मंजूर केले होते. प्रशासकीय उदासीनता व निधीअभावी ते रखडले आहे. ते केव्हा सुरु होईल याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com