जामनेरला ऑक्सीजनचा साठा संपल्याने एकाचा मृत्यू

जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन साठा संपल्याने रुग्णांना तातडीने जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
111
111

जळगाव : जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन साठा संपल्याने रुग्णांना तातडीने जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जामनेर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात  कोरोनाचे १८ रुग्णांना  ऑक्सीजन देण्यात येत होता. हा उपचार सुरु असताना ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना तातडीने जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. यादरम्यान ११ रुग्णांना तातडीने हलविण्यात आले त्या पैकी एका रुग्णाचा  मृत्यू झाला  व सहा रुग्णावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत
याबाबत माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, ऑक्सीजन बाबत आम्ही  वरिष्ठांना कळविले असून रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी त्यांना गोदावरी मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात कोरोणाची लागण मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात लॉक डाऊन  करण्यात आले आहे परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.अनेक भागात दुकाने उघडीच असल्याचे दिसून येत असून रस्त्यावर वर्दळही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या स्थिती गंभीर बाब निर्माण झाली आहे. जामनेर येथील या घटनेमुळे जनतेत अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com