ही काही चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही - This is not Chambal`s Decoit`s fight says Raut, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

ही काही चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही

संपत देवगिरे
रविवार, 13 जून 2021

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या राज्याच्या तीव्र भावना पंतप्रधानांना सांगितल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी याबाबत दिलासा देणारा निर्णय द्यावा. तसेच यासंदर्भात मराठा आरक्षणाचा सगळ्यात पहिला मोर्चा दिल्लीत काढून पंतप्रधानांना ‘एक मराठा-लाख मराठा‘ची ताकद दाखवून द्यावी, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या (Cm Coneys his concern on Maratha Rservation To PM) राज्याच्या तीव्र भावना पंतप्रधानांना सांगितल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी याबाबत दिलासा देणारा निर्णय द्यावा. तसेच यासंदर्भात मराठा आरक्षणाचा सगळ्यात पहिला मोर्चा दिल्लीत काढून पंतप्रधानांना ‘एक मराठा-लाख मराठा‘ची ताकद दाखवून द्यावी, (First Maratha morcha shall be in Delhi) असे शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. 

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी श्री. राऊत यांनी शिवसेना कार्यालयात संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या अनुषंगाने ते म्हणाले, की यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाचे संस्कार केले आहेत. शिवाय शत्रूत्व कायमस्वरुपी राहत नाही. ही चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही. शिवाय वाघाच्या मिशीला हात लावायला हिंमत लागते. त्याची मी वाट पाहतोय.

ते म्हणाले, पंढरीच्या वारीसंबंधाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारकरी संप्रदायाशी चर्चा करताहेत. सामाजिक भावनेतून सरकारने आषाढी वारी बसने आणि वाखरी ते पंढरपूर पायी वारीला परवानगी हा निर्णय सरकारने मनावर धोंडा ठेऊन केला आहे. पण काही संघटना आणि विरोधक उचकवत वारकरी बांधव आणि जनतेच्या जीवाशी खेळाताहेत, असा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करायची असल्यास विरोधकांनी भडकावण्याचे काम करावे. 

श्री. राऊत म्हणाले, की कोरोनाची बंधने पाळली जातात. मात्र राजकारण थांबत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे काम पाहत असताना पक्षाची बांधणी करणे हे आमचे काम आहे. ग्रामीण भागात संदेश लवकर पोच नसल्याने गोंधळाची परिस्थिती राहू नये म्हणून आपला दौरा सुरु आहे. राज्याच्या सत्ताकारणात मुंबई, कोकणप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे योगदान आहे. तीच परिस्थिती आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पुढील विधानसभा निवडणुकीत कायम राहावी यादृष्टीने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यात येत आहे. सत्ता असूनही प्रश्‍न आहेत. ते पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे.

तर बरोबरीची लढाई होईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यातील चर्चेविषयी श्री. राऊत म्हणाले, की विरोधी पक्षांची आघाडी केल्यास बरोबरीची लढाई सत्ताधारी भाजपशी होईल. पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळमध्ये भाजपला यश मिळाले नाही. त्यामुळे २०२४ मधील निवडणुकीत काय होणार याचे आडाखे बांधावे लागतील. राजकारण चंचल आहे. इंदिरा गांधी आणि पंडीत नेहरु यांनाही राजकारणात मुठीत ठेवता आले नाही. राहूल गांधी, शिवसेनेशी सोबत प्रशांत किशोर यांची पूर्वी झाली होती. त्यामुळे श्री. पवार हे देश, राज्याची माहिती घेत असल्यास गैर काय आहे.

कृषीमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, वसंत गिते, विनायक पांडे आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

राजेश टोपे यांनी दिले समूह आरोग्यधिकारी नेमण्याचे आदेश

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख