तिन्ही कृषी कायदे रद्द व्हावेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका!

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याबाबत शरद पवार यांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
Nawab Malik
Nawab Malik

मुंबई : केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याबाबत शरद पवार यांनी सल्ला दिलेला नाही. (Sharad Pawar doesn`t given suggetion on Agreeculture laws) तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे, (Media published missleading information onthis issue) असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawad Mallik) यांनी केला आहे. 

केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्याला महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा कालपण विरोध होता... आजपण आहे आणि उद्या देखील राहिल अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी सांगितली. 

ते म्हणाले, विधानसभेत याविरोधात प्रस्ताव पारित करण्याचे सरकारकडून काम होणार आहे. त्या कायदयाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करेल त्यानंतर ती समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी बोलेल.नंतर मसुदा तयार करुन पुढे कसं जायचं. शेतकऱ्यांना तो मसुदा मंजूर होणार नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही. 

शरद पवार यांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची याबाबतीत माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्याबाबत शरद पवार यांनी सल्ला दिला असा होत नाही असेही मलिक यांनी सांगितले. 

आमच्या सरकारचा व आमच्या पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तिन्ही कृषी कायदयाला कायम विरोध राहिलेला आहे हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com