नाशिकला ऑक्सीजन गळतीने 22 रुग्ण दगावले? - Nashik O2 leakage 11 covid patients dead? Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकला ऑक्सीजन गळतीने 22 रुग्ण दगावले?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सीजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात अकरा रुग्णांचे निधन झाल्याचे एका वाहिनीने दिले आहे.

नाशिक : महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सीजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात 22 रुग्णांचे निधन झाल्याचे एका वाहिनीने दिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. 

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात 22 रुग्ण दगावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे कळते. या रुग्णालयात  कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु होते. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने लिकेजमुळे ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत झाला. त्यात व्हेंटीलेटरवर असलेले अकरा रुग्ण दगावले. तेरा रुग्ण अत्यावस्थ आहेत. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्य व दवाखान्याच्या कामकाजात अडथळे येत होते.  

आज सकाळी अकराला गॅस रिफीलींग करताना हा प्रकार घडला. येथे शंभऱहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी येथे नव्याने एक किलो लिटरचा (एक टन) क्षमतेचा सिलेंटर बसविण्यात आला होता. आज सकाळी त्यात फिलींग करतांना गॅस गळती झाली. त्यामुळे धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॅाक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विविध रुग्णवाहिकांतून रुग्ण हलविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. गळतीचे कारण व नेमकी त्रुटी स्पष्ट झालेली नाही. 

दरम्यान यासंदर्भात रुग्णालयातील कर्मचारी स्त्रोतांनुसार प्राणवायूच्या गळतीने व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विशेष देखभाल केली जात आहे. त्यांच्यासाठी नियमीत ऑक्सीजन सिलेंडरद्वारे पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. यात काही रुग्णांची प्रकृती खालावली. तर प्रशासनाने तेरा रुग्णांना अन्यत्र हलविले. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलविले आहे. मात्र यामध्ये काही रुग्ण दगावले अशी चर्चा रुग्णालयाच्या परिसरात पसरल्याने नागरिकांची गर्दी झाली. येथे कोरोनाचे रुग्ण असल्याने मास्क, सोशल डिस्टन्स याबाबत दक्षता घेण्यासाठी सुरक्षा रक्षक व पोलिसांकडून केली जात आहे. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख