शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात डेरेदाखल; शिवसेना नेत्याला भाषणासाठी निमंत्रण 

आझाद मैदानात हा मोर्चा तीन दिवस मुक्कामी असणार आहे.
Nashik farmers' morcha enters Azad Maidan; Invitation to Shiv Sena leader for speech
Nashik farmers' morcha enters Azad Maidan; Invitation to Shiv Sena leader for speech

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या निषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाद्वारे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. 26 जानेवारीला आझाद मैदान येथे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना देण्यात येणार आहे. 

नाशिकच्या गोल्फ क्‍लब मैदानातून निघालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कसारा, भिवंडीमार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकला. हजारो शेतकरी ट्रक, टेंपो, चारचाकी, दुचाकीने मोर्चात सहभागी झाले होते. शेतकरीविरोधी तीनही कायदे रद्द करण्याबरोबरच शेतमालाला पुरेसा मोबदला देणारा हमीभाव देण्याची तरतूद असलेला कायदा करावा, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी सांगितले. 

आझाद मैदानात हा मोर्चा तीन दिवस मुक्कामी असणार आहे. मंगळवारी (ता. 26 जानेवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच राज्यातील प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच ते मोर्चाला संबोधितही करणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली. 

दरम्यान, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे मोर्चाला संबोधित करावे, अशी आमची इच्छा शिवसेना नेतृत्वाकडे व्यक्त केल्याची माहिती कम्युनिस्ट नेते डॉ. ढवळे यांनी दिली. 

हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नसून सर्वसामान्य नागरिकांचे आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला मदत करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधातील हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल. या आंदोलनाला शंभरहून अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. 
- डॉ. अजित नवले, नेते, अखिल भारतीय किसान सभा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com