नारायण राणे नाशिक पोलिसांकडे ऑनलाईन जबाब देणार

मुख्यमंत्र्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा या प्रकरणात श्री राणे यांच्या विरोधात सर्वात आधी दाखल झालेला पहिला गुन्हा आहे. याबाबत आपण ऑनलाइन जबाब नोंदवू असे श्री राणे नाशिक पोलिसांना कळविले आहे.
Narayan Rane
Narayan Rane

नाशिक : मुख्यमंत्र्यांविषयी अवमानकारक (Indecent comenton CM) वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर नाशिक पोलिसांनी (Nashik City Police) गुन्हा दाखल केला आहे. (FIR Registered) हा या प्रकरणात श्री राणे यांच्या विरोधात दाखल झालेला दाखल झालेला पहिला गुन्हा आहे. (It is first FIR) या गुन्ह्यासंदर्भात येत्या २५ सप्टेबरला आपण ऑनलाइन (Rane will registere statement online) जबाब नोंदवू असे श्री राणे नाशिक पोलिसांना (Nashik Police) कळविले आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी   यासंदर्भात कायदेशीर प्रक्रीयेचे अतिशय काटेकोर पालन करीत श्री राणे यांच्या अटकेची प्रक्रीया पूर्ण केली होती. मात्र  रत्नागिरी पोलिसांनी याच प्रकरणात श्री राणे यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळेच श्री राणे यांना अटक करण्यासाठी गेलेले नाशिक पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतावे लागले होते. यावेळी त्यांनी श्री राणे यांना नोटीस बजावली होती.

यासंदर्भात श्री राणे यांनी आज पोलिसांना यासंदर्भात कळविले आहे. २ सप्टेंबर रोजी नाशिकला हजर राहायचे होते मात्र, उच्च न्यायालयाने १७ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने आता २५ सप्टेंबर रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू असे कळविल्याचे पत्र केंद्रीय मंत्री राणे यांनी पाठविल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय  यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान २४ ऑगस्टला श्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंची तक्रार केली होती.

याप्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाईन जबाब घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री राणे २ सप्टेंबर रोजी नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचं कारण देत त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी पोलीस त्यांना प्रश्न विचारणार आहे. राणेंच्या उत्तरानुसार पोलीस जबाब नोंदवून घेणार आहे.

...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com