महाराष्ट्र पोलिस अकादमी काळानुरूप आधुनिक व्हावी

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे.
MPA f
MPA f

नाशिक : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी अधिकारी देणाऱ्या (MPA trained officers to Peoples security in the state महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. (Government will take all efforts to fullfill MPA`s necessory requirements) नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thakre) येथे केले. 

महाराष्ट्र पोलिस अकादमीत नव्याने तयार करण्यात आलेल्या पाच मैदानांसह उद्यानाचे उद्‌घाटन सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, अपर पोलिस महासंचालक संजय कुमार, पोलिस आयुक्त दीपक पांडे, अकादमीच्या संचालक अश्‍वती दोर्जे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते अकादमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटिक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलीबॉल मैदान, तसेच निसर्ग उद्यानाचे उद्‌घाटन झाले. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सीमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे या वेळी उपस्थित होते. 

सरप्राइज व्हिजिट देणार 
मुख्यमंत्री म्हणाले, की डिसेंबर २०१९ मध्ये भूमिपूजन झालेल्या आराखड्यानुसार कोरोनाच्या अडचणीतही काम करीत, पोलिस अकादमीच्या निसर्गरम्य परिसरात उत्तम सुविधा निर्माण केल्या. अकादमीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने येथील सुविधा व प्रशिक्षण बघण्यासाठी अचानक भेट देईन. माझे राज्य पुढे कसे जाईल, हा विचार म्हणजे संघभावना आहे. महाराष्ट्र पोलिस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. पोलिसांमध्येही क्रीडा राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देणे, सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. क्रीडा स्पर्धेतील यशासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीबाबत पोलिसांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. 

अन्य प्रशिक्षणार्थींनाही उपयोग : भुजबळ 
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की लोकशाहीत कायद्याची बूज राखणारे सक्षम पोलिस दल महत्त्वाचे आहे. असे सक्षम अधिकारी घडविण्यासाठी नव्याने निर्माण केलेल्या सुविधा उपयुक्त ठरतील. पोलिसांसोबत अन्य विभागांतून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाही त्याचा उपयोग होईल. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी क्रीडा सुविधांचा उपयोग करून यश मिळवावे. पोलिस अकादमीत चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी उपयोग करून घ्यावा. पोलिस दलात संघभावना असतेच. खेळांमुळे ती अधिक मजबूत होते. 

ऑलिम्पीक खेळाडू तयार व्हावेत
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, की ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने येथील सुविधांचा उपयोग होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची फायरिंग रेंज उपलब्ध झाल्याने देशपातळीवर तिचा उपयोग होईल. ॲकॅडमीत व्यवस्थापन आणि नागरिकांशी असणाऱ्या संबंधांचेही प्रशिक्षण दिले जाते. गुन्हेगारांचे मानसशास्त्र आणि संवादाचे प्रशिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. नव्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन अकादमीने नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा. येथे देखील आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पीक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा श्री. वळसे-पाटील यांनी व्यक्त केली. 

पदोन्नतीची मागणी 
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की उत्तम क्रीडा सुविधांच्या माध्यमातून नवा इतिहास निर्माण करण्याची पायाभरणी झाली आहे. येणाऱ्या बॅचमधील प्रत्येक अधिकाऱ्यांना या सुविधांमुळे चांगल्या कामाची प्रेरणा मिळेल. पोलिस महासंचालक पांडे म्हणाले, महाराष्ट्र पोलिस अकादमी ११५ वर्षे जुनी असून, उत्तम दर्जाचे प्रशिक्षक येथे उपलब्ध आहेत. येथे उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने येथील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पोलिस दलातर्फे करण्यात येत आहेत. प्रास्ताविकात संजय कुमार यांनी पोलिस उपनिरीक्षकांना चार पदोन्नत्या, प्रशिक्षणार्थीना वैद्यकिय बिल मिळावे, अशी मागणी केली.  
...हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com