चंदूभैया..., पूर्वी गोरगरिबांचं धान्य विकून खाल्लं; आता रेमडेसिव्हिर विकता..? किती करणार पापं?

हे इंजेक्शन बाहेर विकता येत नाही.
MP Hina Gavit accuses former MLA Chandrakant Raghuvanshi of taking Remdesivir injection
MP Hina Gavit accuses former MLA Chandrakant Raghuvanshi of taking Remdesivir injection

नंदूरबार : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचे नातेवाईक सैरभैर झाले असून राजकीय नेतेमंडळी मात्र आरोप-प्रत्यारोपात दंग आहेत. याच मुद्यावरून नंदूरबारच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार हिना गावीत यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर ही इंजेक्शन विकल्याचा आरोप केला आहे. 

चंदूभैया किती खोटं बोलणार तुम्ही. आज तुमचं रोटरीचं दुकान बंद झाले; म्हणून जिल्ह्याचे इंजेक्शन यायचे बंद झाले नाहीत. उलट आता रुग्णांना रुग्णालयात इंजेक्शन मिळणार आहे. पूर्वी तुम्ही गोरगरिबांचे रेशनिंग धान्य, रॉकेल विकून खाल्लं. आता लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या कोरोनाकाळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकायचे, काळाबाजार करायचं काम तुम्ही करत आहात .किती पाप करणार आणि कधी फेडणार हे सर्व पाप, असा सवालही हिना गावीत यांनी रघुवंशी यांना केला आहे.

खासदार गावीत यांनी चार व्हिडिओ ट्विट करत माजी आमदार रघुवंशी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नंदूरबार लोकसभा मतदारसंघा रेमडेसिव्हिरचा तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे फोन येते होते. त्यामुळे मतदारसंघात रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कंपन्यांकडे माझा पाठपुरावा सुरू होता.

केंद्रीय मंत्र्यांनाही विनंती केली होती की संबंधित कंपन्यांना सांगून या मतदारसंघात रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. सततच्या पाठपुराव्यामुळे एका कंपनीने आम्हाला दीड हजार इंजेक्शन दिली. ती इंजेक्शन आम्ही कोविड रुग्णालयांना उपलब्ध करून दिली. कंपनीला विनंती केली हेाती थेट इंजेक्शन मिळतील का, याचीही चाचपणी केली होती. मात्र, ती मिळाली नाहीत. 

जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वेगाने वाढत आहेत. रुग्णांना रेमडेसिव्हिरची गरज आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी फोन केले. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यां विनंती केली जसं तुम्ही रोटरी वेलनेसला इंजेक्शन दिली, तशी प्रत्येक रुग्णालयास द्यावी. पण त्यांनी ती दिली नाहीत. शेवटी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून रुग्णालयांना ५०० इंजेक्शन दिली.

रोटरी वेलनेस सेंटरला जी इंजेक्शन मिळाली आहेत. त्यातील किती इंजेक्शन रुग्णांना मिळाली, याची माहिती घेतली असता अत्यंत धक्का बसला. रोटरी वेलनेसने ही इंजेक्शन बाहेर विकल्याचे उघड झाले. राज्य सरकारच्या आदेशानुसार हे इंजेक्शन बाहेर विकता येत नाही. ते फक्त ज्या रुग्णालयात कोविड पेशंट आहेत, त्यांनाच विकता येईल. मात्र, नंदूरबारचे कलेक्टर आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संगनमताने जिल्ह्याला येणार जो सरकारी साठा होता. तो बाहेर विकला, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com