नाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी 

महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, परंतु नाशिक दत्तक मोहीम फोल ठरली. नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत मनसे स्वबळावरच निवडणुका लढविणार आहे.
नाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी 
Sandip Deshpande

नाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, (Devendra Fadanvis adopted nashik in last election)  परंतु नाशिक दत्तक मोहीम फोल ठरली. नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. (Nashik people disillusionment) त्यामुळे पुढील निवडणुकीत मनसे स्वबळावरच निवडणुका लढविणार आहे. पुन्हा एकदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकावू असा दावा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केला. येत्या निवडणुकीत भाजपच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे व संदीप देशपांडे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्री. देशपांडे बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या साडेचार वर्षातील सत्ता काळाचा विचार करता नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजप व मनसे सत्ताकाळाचा विचार करता मनसेच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात कामे झाली. राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम असल्याने सामाजिक दायित्वाच्या निधीतून नाशिकमध्ये मोठे प्रकल्प आणले. यापूर्वी असे प्रयोग कोणी केले नाही. आगामीकाळात सत्ता आल्यास नाशिकसाठी नवीन प्रकल्पाबरोबरच देशातील सुंदर शहर घडविण्याचा प्रयत्न राहील. मागील काळात मनसे मार्केटिंगमध्ये कमी पडले. काही पक्ष कामे एक रुपयाची करतात व दाखवितात शंभर रुपयांची. मनसेने जी कामे केली तिचं लोकांसमोर मांडल्याचे देशपांडे म्हणाले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार आदी उपस्थित होते. 

दूरदृष्टीच्या नेत्यांकडे सत्ता द्या 
सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. सोळा फुटांवर पुराचे पाणी पोचल्यानंतर प्रशासनाला जाग आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूल बांधण्याच्या वक्तव्यावर बोलताना नद्यांवर भिंत बांधल्याचे कोणी ऐकलंय का, असा सवाल करताना सरकार नागरिकांची चेष्टा करत सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला. समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली होती. कुठे आहे ते शिवस्मारक, असा सवाल करताना दूरदृष्टी असलेल्या नेत्यांकडे सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कोकणच्या पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या वतीने मदतसाहित्य जमा करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध साहित्यासह धान्य, पिण्याचे पाणी, सॅनीटायझर, बिस्किटे यांसह विविध खाद्यपदार्थांचा समावेष आहे. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर हे साहित्य जमा करण्यात आले. हे साहित्य माजी आमदार बाळा नांदगावकर, अमित ठाकरे आणि देशपांडे यांच्या उपस्थितीत कोकणला कार्यकर्त्यांसह रवाना केले जाणार आहे.  

...

हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in