मनसेला आठवले बोटॅनिकल गार्डन, मात्र राज ठाकरे मुंबईला गेल्यावर

मनसेच्या सत्ताकाळात राबविण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनची दुरवस्था गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना या गार्डनची दुरवस्था दिसून आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी विभागीय वनसंरक्षक प्रवीण दामले यांची भेट घेत दुरवस्था तातडीने थांबवण्याची मागणी केली.
Raj Thakre
Raj Thakre

नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात राबविण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनची दुरवस्था (Botanical garden in bad situation now) गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना या गार्डनची दुरवस्था दिसून आली आहे. (MNS recall this garden issue bu after Raj Thakre ieave for Mumbai) त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी विभागीय वनसंरक्षक प्रवीण दामले (Forest officer Praveen Damle) यांची भेट घेत दुरवस्था तातडीने थांबवण्याची मागणी केली.

सन २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये सत्ताकाळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवर कुठल्याही आर्थिक बोजा न पडू देता सामाजिक दायित्वाच्या निधीतून मोठे प्रकल्प आणले. त्यात पं. जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डन हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. रतन टाटा यांनी नाशिकमध्ये हजेरी लावून या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. नाशिकमध्ये पर्यटनाचे लोकेशन म्हणून बोटॅनिकल गार्डनला नाशिककरांनी पसंती दिली होती. मात्र, भाजपची सत्ता गेल्यानंतर गार्डनकडे दुर्लक्ष झाले. 

कालांतराने टवाळखोर व प्रेमयुगलांचा अड्डा बनला, उद्यानात बसविलेले लेझर लाइटिंगयुक्त बोलकी झाडे, फुलपाखरू प्रवेशद्वार, लहान मुलांची खेळणी आदी दुरवस्था झाली. बंद पडलेला बोलकी झाडांचा शो, तुटलेली खेळणी, मोकळ्या जागेत समाजकंटकांकडून होणारे मद्यसेवन आदी घटनांमुळे हे स्थळ बदनाम होत गेले.

मनसे पदाधिकाऱ्यांनी अधूनमधून बोटॅनिकल गार्डनची दुरवस्था थांबवण्यासाठी निवेदन दिले, मात्र मनसे स्टाइल आंदोलनाचा पवित्रा घेतला नाही. आता निवडणुका जवळ येत असताना उद्यानाची दुरवस्था प्रकर्षाने आठवली. यासंदर्भात महापालिका आयुक्तांसह विभागीय वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले. बोटॅनिकल गार्डनमध्ये तत्काळ सुधारणा कराव्यात अन्यथा मनसेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, सत्यम खंडाळे, योगेश लभडे, श्याम गोहाड, संतोष जगताप, संजय देवरे, अमित गांगुर्डे, सिद्धेश सानप आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com