सहज भेट म्हणता, म्हणता भाजप- मनसेचे जुळले सूत?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. गेले काही दिवस सहज भेट असे म्हणता म्हणता आज त्यांची राजकीय भेट झाली.
Raj Thakre- Chandrakant Patil
Raj Thakre- Chandrakant Patil

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (MNS Supremo Raj Thakre & BJP state president Chandrakant Patil meet today ) यांची आज भेट झाली. गेले काही दिवस सहज भेट असे म्हणता म्हणता आज त्यांची राजकीय भेट झालीच. (Last some days it is in deliberation now came true) त्यातून लगेचच काही बाहेर येण्याची चिन्हे नाहीत. (This may not give any immediat result) मात्र ही मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी म्हणून पाहिली जाते. 

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची आज झालेली भेट निश्चितच नव्या राजकीय समिकरणांची नांदी आहे. त्याला प्रामुख्याने शिवसेनेच्या दृष्टीने राजकीय प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेची सत्ता हा विषय आहे. दोन आठवड्यापूर्वी श्री. ठाकरे आणि श्री. पाटील दोघेही एकाच वेळी नाशिकच्या दौऱ्यावर होते. योगायोगाने ते दोघेही शासकीय विश्रामगृहावरच मुक्कामाला होते. यावेळी त्यांची विश्रामगृहाच्या आवारात भेट झाली. ही भेट चर्चेचा विषय यासाठी ठरली की, त्या आधी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाची युती होणार अशी चर्चा सुरु झाली होती. 

नाशिकला दोन्ही नेत्यांची भेट झाल्यावर प्रारंभी भाजपच्या बहुतांश नेत्यांनी सहज झालेल्या भेटीला राजकीय विषय चिकटवू नयेत. ती भेट राजकीय नव्हती असे वारंवार सांगितले होते. `मनसे`कडून तर युतीची शेक्यताच फेटाळून लावत नाशिक महापालिकेत स्वबळाचा नारा देण्यात आला. त्यामुळे आज देखील दोन्ही पक्ष एकत्र येतील का? याचे उत्तर घाईचे होईल. मात्र राजकीयदृष्ट्या राज्याला हा एक नवा विषय मिळाला एव्हढे मात्र खऱे. 

सध्या कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लागू आहेत. सहकारी व अन्य काही संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र पुढील वर्षी मार्च महिन्यात मुंबईसह राज्यातील विविध महापालिका आणि जिल्हा परिषद- पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी या नवी राजकीय समिकरणांनतर, त्यातही शिवसेना त्याचे नेतृत्व करीत असल्याने अत्यंत प्रतिष्ठेची आहे. 

राज्यातील सरकार पाडण्याचे जाहीर केलेले अनेक मुहुर्त, सतत आरोपांचा धुरळा करून गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपला काही तरी ठोस राजकीय यश आवश्यक आहे. पक्षाची राज्यातील पत व विधानसभेला आयात केलेल्या नेत्यांनी पक्ष सोडून जाऊन नये, यासाठी त्यांचे मनोबल उंचावण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने भाजप- मनसे मैत्रीतून मनसेला किती लाभ होईल हे नक्की नाही, मात्र भाजपला त्याचा नक्कीच लाभ होऊ शकतो हे खरे. 

याअनुषंगाने अनेक सूचक घडामोडी घडताना दिसतात. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. `मनसे`ने एकही उमेदवार दिला नाही. विधानसभेला मोजके उमेदवार दिले. मात्र त्यांनी महत्त्वाच्या शहरात प्रचारसभा घेऊन भाजप व श्री. मोदी यांच्यावर टिकेचा भडीमार केला होता. विशेषतः `गुजरात`ला ते सतत लक्ष्य करीत होते.  त्यातून सामान्यांच्या तोंडी `ऐ लावरे तो व्हीडिओ` ही पंच लाईन सहज उच्चारली जाऊ लागली. आता हे टिका करणारे व्हीडिओ सोशल मीडिया व इतर संकेतस्थळांवरून रिमूव्ह झालेले दिसतात. हे सर्व सुचक आहे. त्याचे राजकीय स्पष्टीकरण राज ठाकरे देतील. 

मराठी माणसांची, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची अन् महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष अशी ओळख निर्माण केलेल्या शिवसेनेला अडचणीत आनण्याचा त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला तर काय?. कारण गेले काही दिवस त्यांनी घेतलेल्या विविध डावपेचांतून विशेष राजकीय लाभ त्यांना पदरात पाडता आलेला नाही. राज ठाकरे एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला लोकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र पक्षाचे कमकुवत झालेले संघटन हा एक प्रमुख अडथळा आहे. आता नव्या सहकाऱ्याला बरोबर घेऊन ते किती यशस्वी होतात, याची उत्सुकता राहीलच.

....   
     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com