`आरएसएस`च्या दबावातून खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले!

देशाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता. परंतू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक तथा आरएसएसच्या दबावात येऊन त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे.
Narendra Modi
Narendra Modi

पिंपरी : देशाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता. (Rajiv Gandhi Khelratna Award is supreme award in Indian sports) परंतू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक तथा आरएसएसच्या दबावात (PM Narendra Modi change the award`s name under RSS pressure) येऊन या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याचा आरोप (Congress made this allegation) कॉग्रेसने केला आहे. 

त्यांनी हा रडीचा डाव खेळला असल्याची टीका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे (Sachin Sathe) यांनी केली.आता मोदींनी स्वतःच्या नावे उभारलेल्या स्टेडियमचे आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिलेल्या स्टेडियमचेही नामांतर करून औदार्य दाखवावे, अशी खोचक मागणी त्यांनी केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद यांचे योगदान वंदनीय आहे,यात वाद नाही, हे स्पष्ट करताना खेळाडूंविषयी खरोखर आदर व्यक्त करायचा होता, तर भाजप व आऱएसएसने आणखी दुसरा क्रीडा पुरस्कार जाहीर करायला हवा होता,असे साठे म्हणाले.परंतू नेहरू, गांधी घराण्याच्या नावाबदलच्या तिरस्कारातून त्यांनी हा नामबदल केल्याचे त्यांनी सांगितले.परंतू, राजीव गांधी यांचे नाव देशातील जनतेच्या मनामनात कोरलेले असल्याने पुरस्कारावरील हे नाव बदलून त्यांचे बलिदान देशातील जनता विसरणार नाही.

पण, एखाद्या नावाविषयी किती पराकोटीचा द्वेष असू शकतो हे,मात्र मोदी यांच्या कृतीतून देशवासीयांना कळले,असा टोलाही त्यांनी मोदी व भाजपला लगावला.देशातील क्रीडा क्षेत्राची पायाभरणी काँग्रेसच्या काळात झाली. सध्या सुरू असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत जे भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत त्यातील बहुतांशी खेळाडूंचा सराव काँग्रेसच्या काळात उभारलेल्या स्टेडियममध्ये आणि क्रीडासंकुलात झालेला आहे,हे सांगत राजीव गांधी यांचे नाव या क्रीडा पुरस्काराला सार्थ कसे होते, हे साठे यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

मोदी सरकारमुळे देशात बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाई वाढली आहे. देशाचा जीडीपी खाली आला असून इंधनदर रोजच वाढत आहेत. याविषयी देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्ययाकडे दुर्लक्ष व्हावे या कुटील हेतूने भाजप सरकारने हा नामबदलाचा निर्णय घेतला आहे. ते सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून ते झाकण्यासाठीच आणि देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा  रडीचा डाव मोदींनी खेळला असल्याचे साठे म्हणाले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com