प्रा. कवाडे म्हणाले, अन्यथा लढा, पाडा अन हरवा ही रणनिती 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात आमचीही महत्वाची भूमिका असल्याने आम्हालाही सत्तेत वाटा द्या. महामंडळ, प्राधिकरण, शासकीय समित्यांवर तरी प्रतिनिधित्व द्या अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.
Jogendra Kawade
Jogendra Kawade


नाशिक : ओझरला एचएएल कारखाना आणणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला द्यावे, (Ozar Airport`s name should Karmveer Dadasaheb Gaikwad) लोकनते दि. बा. पाटील यांचे नाव नविन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे. (New Mumbai Airport name shall D. B. Patil) सरकारने या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन उभारू. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात आमचीही महत्वाची भूमिका असल्याने आम्हालाही सत्तेत वाटा द्या. महामंडळ, प्राधिकरण, शासकीय समित्यांवर तरी प्रतिनिधित्व द्या अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे ( Prof. Jogendra Kawade) यांनी येथे केली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागा द्या असे सांगत जो दे उसका भला, जो ना दे उसका सत्यानाश, आम्हाला भीक नको, हक्क हवाय. अन्यथा लढा, पाडा, हरवा ही रणनिती आम्हाला अवलंबावी लागेल, असा इशाराही श्री. कवाडे यांनी देऊन टाकला. आंदोलनांमधून पक्षाची राजकीय ताकद वाढवा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 

तुमचे उपद्रवमूल्य वाढवा 
नाशिक रोड येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय पदाधिकारी निवडप्रसंगी ते बोलत होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, की आयटी सेल मजबूत करा. पक्षाची ताकद आंदोलन, संघर्षातून दिसते. चमत्कार असेल तरच नमस्कार घातला जातो. त्यामुळे संघटना वाढवून, आंदोलने करुन पक्षाची ताकद सरकारला दाखवून द्या. आपला धाक निर्माण करा, उपद्रवमूल्य वाढवा, तरच आपल्याला सन्मान मिळेल, सरकार दखल घेईल. संधी सोडली तर रडत बसावे लागेल. लढता लढता मरू पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. पैसा, सत्ता नसताना आपला पक्ष ताठ मानने उभा आहे. निवडणूक लढवून, क्रियाशील सभासद वाढवून पक्षाची ताकद वाढवा. शशिकांत उन्हवणे यांनी सूत्रसंचालन केले. 

अशी झाली पदाधिकारी निवड 
प्रदेश अध्यक्षपदी गणेश उन्हवणे, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, उपाध्यक्ष मिलिंद सुर्वे, अजमल पटेल, संभाजी गायकवाड, जगन सोनवणे, अरुण गजभिये, महासचिव बापूसाहेब गजमारे, सचिव अॅड. मल्हारी बनसोडे, सुनील क्षेत्रे, अशोक तांबे, अशोक जाधव, पुरण लोणारे सह सचिव अॅड. जगन्नाथ गुल्हाणे, नरेंद्र डोंगरे, संघटन सचिव प्रमोद टाले, खजिनदार अशोक कांबळे, संघटक एन. डी. सोनकाबळे, प्रकाश चावरिया, गौतम मुंढे, विजय वाघमारे, सह संघटक राजरत्न गणवीर, रवींद्र गायकवाड, आनंद कडाळे, प्रवक्ता प्रकाश राजेश जाधव सहप्रवक्ता डॅा. जयंत गायकवाड याच्यासह 75 सदस्याची निवड करण्यात आली. नविन कार्यकारिणी सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com