फरीदासाठी जितेंद्र आव्हाडांची थेट ममतादिदींना विनंती

मतदारसंघाच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहेमीच सक्रीय असलेले जितेंद्र आव्हाड यांची जागरूकता पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यांच्या मुंब्रा मतदारसंघातील महिला फरीदा इलियास कुरेशी हिला पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी अटक केली.
Jitendra Avhad
Jitendra Avhad

मुंबई : मतदारसंघाच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहेमीच सक्रीय असलेले जितेंद्र आव्हाड यांची जागरूकता पुन्हा एकदा दिसून आली आहे. (Housing Minister very active in constiuency`s issue) त्यांच्या मुंब्रा मतदारसंघातील महिला फरीदा इलियास कुरेशी हिला पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी अटक केली. (Farida qureshi of Mumbra Arrested by WB Police) त्याबाबत त्यांनी ट्वीट करून त्यात सरकारने लक्ष घालावे (Avhad Tweet to Mamtadidi to look in) अशी विनंती केली आहे.

याविषयी माहिती अशी की फरीदा कुरेशी ही मुब्रा येथील रहिवासी आहे. ती मुळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे. तीचे आई-वडील बंगालमध्ये वास्तव्य करतात. मुब्र्यातील ही फरीदा कुरेशी आईला भेटण्यासाठी पश्चिम बंगालला गेल्या होत्या. त्या गावी पोहोचल्यावर स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झाली नाही.

अटक झाल्याचे कळल्यावर परिसरातील काही नागिरकांनी स्थानिक आमदार म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना त्याविषयी माहिती दिली. श्री. आव्हाड यांनी देखील गांभिर्याने प्रतिसाद देत त्याबाबत चाकशी सुरु केली. त्यानंतर त्यांनी एक ट्विटी केले. त्यात आपल्या मतदारसंघातील फरीदा कुरेशी हिला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीला मदत करावी, अशी विनंती केली आहे. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com