समाजाचा दबाव झुगारून `तो` बहुचर्चीत विवाह उत्साहात संपन्न!  - `That` inter religiouss marriage held, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

समाजाचा दबाव झुगारून `तो` बहुचर्चीत विवाह उत्साहात संपन्न! 

संपत देवगिरे
गुरुवार, 22 जुलै 2021

राज्यमंत्री बच्चू कडू यांसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी पाठींबा दिलेला, मात्र सोनार समाजाने आंदोलन करीत विरोध केलेला आंतरधर्मीय विवाह अखेर आज संपन्न झाला. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने व `लव्ह जिहाद` असा अपप्रचार झालेला, दोन्ही कुटुंबियांच्या ठाम पाठींब्याने आज हा विवाह झाल्याने तो विशेष चर्चेचा विषय ठरला.  

नाशिक : राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu kadu & Various social organisation supported inter religious marrige) यांसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी पाठींबा दिलेला, मात्र सोनार समाजाने आंदोलन करीत विरोध केलेला (Sonar community Opposed this Marrige) आंतरधर्मीय विवाह अखेर आज संपन्न झाला. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने व `लव्ह जिहाद` असा अपप्रचार झालेला, दोन्ही कुटुंबियांच्या ठाम पाठींब्याने आज हा विवाह (Marriage took place today) झाल्याने तो विशेष चर्चेचा विषय ठरला.  

गेले दोन आठवडे चर्चेचा विषय ठरलेला येथी सोनार समाजातील दिव्यांग युवती आणि अन्य धर्मातील युवकाचा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह निश्चित झाला होता. हा विवाह नोंदणी पद्धतीने झाला होता. मात्र मुलीच्या कुटंबियांनी त्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करून हिंदू पद्धतीने हा विवाह समारंभ करण्याचे जाहीर केले होते. त्याचा काही संघटनांनी अपप्रचार केला. सोनार समाजाच्या संघटनांनी प्रचंड दबाव आणल्याने मुलीच्या कुटुंबियांनी समारंभ रद्द करीत असल्याचे पत्र व माफीनामा लिहून दिला होता. त्यामुळे अनिश्चिचता होता.   

यासंदर्भात नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री कडू यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला होता. संकुचित विचार व `लव्ह जिहाद` असा अपप्रचार करणाऱ्या समाजाच्या संघटना व कार्यकर्त्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा  अनिता भामरे यांसह विविध सामाजिक संघटनांनी देखील या कुटुंबियांना पाठींबा दिला होता. दोन्ही कुटुंबे मुलांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने हा नियोजित विवाह आज पार पडला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. 

दोन दिवसांपूर्वी सर्वशाखीय सुवर्णकार समाजातर्फे आंदोलन झाले. यावेळी बच्चू कडू यांनी नाशिक येथे संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाबददल केलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली. त्यांच्या वक्तव्यामुळे व्यथीत होऊन समाजबांधव ह.भ.प. सुनिल मधुकर माळचे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे राज्यमंत्री कडू यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्यांनी माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी व तात्काळ राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. 
...

हेही वाचा...

आम्ही पाणी मागितले, अजितदादांनी धरण दिले!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख