शेतकरी मार्चच्या तुडुंब गर्दीने मुंबई महामार्ग झाला एकेरी

केंद्र सरकारचा निषेध करीत नाशिक येथून शेतक-यांनी मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली. आज हा मोर्चा कसारा येथे पोहोचल्यावर त्यात शेतक-यांची संख्या वीस हजारांवर पोहचली.
Kisan sabha marc
Kisan sabha marc

कसारा : केंद्र सरकारच्या शेतकरी बीलांविरोधात दिल्ली पाठोपाठ आता महाराष्ट्रातही वातावरण तापु लागले आहे. केंद्र सरकारचा निषेध करीत नाशिक येथून शेतक-यांनी मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली. आज हा मोर्चा कसारा येथे पोहोचल्यावर त्यात शेतक-यांची संख्या वीस हजारांवर पोहचली. या प्रचंड गर्दी व वाहनांच्या ताफ्याने महामार्गावर एका बाजुने वाहतूक करावी लागली. 

शनिवारी शेतकर्‍यांच्या कायद्याविरोधात निदर्शने करण्यासाठी शेतकर्‍यांनी मुंबईकडे मार्च सुरु केला. आझाद मैदानात एकत्र येण्यासाठीच.26 जानेवारीपर्यंत ते येथेच ठाण मांड़ीत शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू ठेवतील. 26 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,प्रदेश कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यातील अन्य ज्येष्ठ नेते आझाद मैदानावर होणा-या सभेत सहभागी होतील. 

वाहन मोर्चा संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) बॅनरखाली काढण्यात आला आहे. तो या आंदोलनाचा भाग आहे. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सर्व राज्यांतील शेतकरी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी केंद्र सरकारवर दबावासाठी देशाच्या आर्थिक तसेच महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत येत आहे. 

यासंदर्भात मोर्चाचे आयोजक म्हणाले की, नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानातून सुमारे दहा लाखाच्या जवळपास शेतकरी ट्रक, टेम्पो, पिकअप, मोटरसाईकिल व इतर वाहनांकडून वाहन मोर्चाला सुरुवात केली आहे. वाटेत अन्य शेतकरी त्यांच्यात सामील होतील. हा मोर्चा शनिवारी रात्री इगतपुरी जवळील घाटंडेवी येथे थांबून रविवारी सकाळपासून पुन्हा सुरू झाला आहे. 

संयोजक एसकेएम आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष (एआयकेएस) अशोक ढवळे म्हणाले, “हे तीन कायदे शेतकरीविरोधी, लोकविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक आहेत आणि ते रद्द करावे,अशी आमची इच्छा आहे.  आम्हाला अन्य मागण्यांमध्ये केंद्र सरकारने मोबदला देणारा एमएसपी आणि खरेदीची हमी देणारा केंद्रीय कायदा हवा आहे. येत्या 24 जानेवारीला शेतकरी मुंबईत जमणार आहेत. ते आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करतील. त्यानंतर राजभवनावर मोर्चा काढतील. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर केंद्र शासनाचा निषेध करतील.  या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी भाग घेतील असा दावा त्यांनी केला. 

“शेतमालाच्या कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या निषेधाचे समर्थन करण्यासाठी अनेक राज्यात वाहनांवरुन फेऱ्या काढल्या जात आहेत. महाराष्ट्रात `एआयकेएस`ने देखील मुंबई मार्च द्वारे मोर्चाला सुरुवात केली.  एकट्या नाशिक येथून वीस हजार शेतकरी मोर्चात सामील झाले आहेत आम्ही मुंबईत शेतकरी लाखोंच्या संख्येने पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे,जे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजभवनमध्ये पोहचतील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मागणीची एक सनद देतील असे अखिल भारतीय किसान सभाचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी सांगितले.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com