अरे वा चार्वी....वाढदिवसाला तुला काय भेट देऊ? : राज ठाकरे

आपल्या आवडत्या नेत्याने वाढदिवसानिमित्त कन्येला दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने पाटील यांचे डोळे भरून आले होते.
Happy Birthday to four year old Charvi Patil from Raj Thackeray
Happy Birthday to four year old Charvi Patil from Raj Thackeray

नाशिक : 'अरे वा चार्वी.... किती सुंदर नाव आहे तुझं... किती वर्षाची झालीस तू आज.... बरं मग वाढदिवसासाठी तुला आता काय भेट देऊ?' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ह्या दोन मिनिटांच्या संवादाने चार्वीचे वडील तथा मनसेचे मध्य नाशिक विभागाचे पदाधिकारी कौशल पाटील हे कमालीचे भावुक केले. आपल्या आवडत्या नेत्याने वाढदिवसानिमित्त कन्येला दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने पाटील यांचे डोळे भरून आले होते.  (Happy Birthday to four year old Charvi Patil from Raj Thackeray)

मनसेचे मध्य नाशिक विभागाचे पदाधिकारी कौशल पाटील यांची आपल्या चार वर्षांच्या कन्येला राज ठाकरे यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी इच्छा होती. ती राज यांच्यापर्यत जाताच त्यांनी चार्वीला बोलावून घेत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

दरम्यान, एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे, हे समजताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुलीसह मला बोलावून घेणे आणि आशीर्वाद देणे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी बाब आहे, असेही कौशल पाटील यांनी सांगितले. 

खरंतर चार्वी पाटील हिचा वाढदिवस काल (ता. 16 जुलै) होता. त्या निमित्ताने तिला राज ठाकरे यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी पाटील यांची इच्छा होती. त्यांनी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे ती बोलून दाखवली. ती मुर्तडक यांनी आज (ता. १७ जुलै) राज ठाकरे यांच्या कानावर घातली. त्यांनी होकार देताच मुर्तडक यांनी पाटील आणि त्यांच्या कन्येला विश्रामगृहावर बोलावून घेतले. थोडाही अवधी न लावता राज ठाकरे यांनी देखील या चिमुरडीची भेट घेतली. तिला गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अमित ठाकरे यांनी देखील या चिमुरडीला कडेवर घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ प्रदीप पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com