पालकमंत्री भुजबळ-आमदार कांदे यांच्यात‘ पॅचअप’ 

पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यातील गुफ्तगूनंतर श्री. भुजबळ व कांदे यांच्यात दिलजमाई झाली. जिल्हा नियोजन समितीच्या ५ टक्के आपत्कालीन निधीवरून शनिवारी दोघांत कलगीतुरा रंगला होता.
Bhujbal- Kande
Bhujbal- Kande

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्यातील गुफ्तगूनंतर श्री. भुजबळ व कांदे यांच्यात दिलजमाई (Dispute resolve) झाली. जिल्हा नियोजन समितीच्या ५ टक्के आपत्कालीन निधीवरून शनिवारी (Issue create about 5 % Emergancy fund) दोघांत कलगीतुरा रंगला होता. 

साप्ताहिक कोरोना आढावा बैठकीनंतर श्री. भुजबळ, आमदार कांदे आणि जिल्हाधिकारी मांढरे यांच्यात सुमारे पाऊण तास नियोजन भवनाच्या बंद दाराआड चर्चा होऊन हे ‘पॅचअप’ झाले. 

नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे शिवसेनेचे आमदार असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव करून श्री. कांदे निवडून आले आहेत. नांदगावला शुक्रवारी (ता. १०) झालेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळित झाले. पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीच्या आपत्कालीन निधीतून ५ टक्के निधी द्यावा. सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांप्रमाणे नांदगावच्या पूरग्रस्तांना मदत का मिळत नाही? पालकमंत्री भुजबळ यांच्यात जाणूनबुजून अडसर असल्याची श्री. कांदे यांची भावना असून, त्यातून शनिवारी श्री. भुजबळ व कांदे यांच्यात बैठकीत कलगीतुरा रंगला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १२) झालेल्या बैठकीत प्रथमच आमदार कांदे नाशिकला आले. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांची बंद दाराआड चर्चा होऊन त्यानंतर आमच्यात असे काही नसल्याचा संदेश देण्यासाठी तिघांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. 

असे झाले पॅचॲप... 
कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पूरग्रस्तांप्रमाणे नांदगावच्या पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीतून ५ टक्के आपत्कालीन निधी मिळत नाही, हे या वादाचे मूळ आहे. जिल्हा नियोजन समितीतून आपत्कालीन निधीची सोय असली, तरी कोरोना निर्बंधांमुळे शासनाने एकूण निधीला कट लावला असून, मृत व्यक्ती, जनावरे, बेघरांच्या भोजनाशिवाय इतर खर्च करता येत नाही. पंचनाम्यासह पूरग्रस्तांना २०१८ पासूनच निधी नसल्याने नांदगावच्या पूरग्रस्तांना लगेच निधी कसा द्यायचा, असे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. मात्र, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाला त्वरित प्रस्ताव पाठवून पुनर्विनियोगाचे आश्वासन देत दोघांत पॅचअप घडविले. 

पालकमंत्री छगन भुजबळ महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्यात वैयक्तिक वादाचा विषय नाही. मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी बोललो. २०२१ च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इतर पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत झाली. मग नांदगावला का नाही, हा विषय होता. मात्र, त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला प्रस्ताव पाठवून मदतीचे आश्वासन दिले. 
-सुहास कांदे, आमदार, नांदगाव 

आता बस झाला कलगीतुरा! 
कोरोना निर्बंधांमुळे खर्चावर निर्बंध आले आहेत. नांदगावच नव्हे तर रायगडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अशा मागण्यांना सामोरे जावे लागले होते. शासनाचे पैसे काही मंत्र्यांना येत नाहीत. सचिवांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतची व्यवस्था असते. जिल्हाधिकारी तातडीची मदत आणि विशेष बाब म्हणून शासनाला प्रस्ताव देणार आहेत. त्यामुळे आम्ही हा विषय थांबवत आहोत. 
-छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक  
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com