३१ जुलैपूर्वी `एमपीएससी`सह सर्व नियुक्त्या करणार

सरकार कोणाचेही असो, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना कधीही घडू नये. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची अतिशय संवेदनशीलतेने दखल घेतली आहे. राज्य आयोगाच्या प्रक्रीयेतील सर्व जागांवर येत्या ३१ जुलैपूर्वी नियुक्त्या करण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई : सरकार कोणाचेही असो, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना कधीही घडू नये. (Swapnil lonkar`s suicide is unfortunate incident)  त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची अतिशय संवेदनशीलतेने (CM Uddhav Thakre took this incident sensitively) दखल घेतली आहे. राज्य आयोगाच्या प्रक्रीयेतील सर्व जागांवर येत्या ३१ जुलैपूर्वी नियुक्त्या करण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी याविषयावर निवेदन केले. ते म्हणाले, `एमपीएससी` चा निकालाच्या प्रतिक्षेतील लोणकर या युवकाने आत्महत्या केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशी घटना कोणाबाबतही घडू नये. त्याची राज्य शासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर अतिशय सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्याची अतिशय संवेदनशीलतेने दखल घेतली. यावर तातडीने सर्व अंगाने माहिती घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत आज सायंकाळी संबंधीत विभागांचे अधिकारी, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच जीएडी विभागाच्या सचिवांसह बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्राप्त परिस्थितीत काही निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उपमुख्यमंत्री म्हणाले, मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यात उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिले. त्यामुळे राज्य आयोगाला कामकाजात काही अडचणी आल्या. नियुक्तीसहल काही मागण्यांसंदर्भात विविध आंदोलने झाली. निवडणुका देखील घेता आल्या नाही. एका मुख्यमंत्र्याला सहा महिन्यात निवडणूक न झाल्याने राजीनामा द्यावा लागला आहे. त्याने काहींचा भ्रमनिरास झाला. त्यात स्वप्नीलने आत्महत्या केली. त्याने ती करायला नको होती. मात्र आता आम्ही ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्य आयोगाने प्रक्रीया केलेल्या तसेच अन्य सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

या जागा भरताना राज्य लोकसेवा आयोगाला स्वायतत्ता आहे. त्यामुळे तीथे आपल्याला फार काही करता येत नाही. मात्र तरीही सध्या मुलांमध्ये नैराश्य येत आहे. ही वेगळी परिस्थिती लक्षात घेऊन ज्या प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलिस यांच्या नियुक्त्यांबाबत काही बदल केले आहेत. त्याप्रमाणे या प्रकरणात काय करता येईल याचा विचार करीत आहोत. याविषयी लवकर निर्णय व्हावा म्हणून सरकार सकारात्मक आहे. सदस्यांनी आत्महत्या केलेल्या लोणकरच्या कुटुंबियांना मदतीचा विषय मांडला, त्याचा देखील विचार करू. 

यावेळी विरोधी बाकांवरून मात्र सातत्याने गोंधळ सुरु होता. भाजपचे सदस्य याबाबत घोषणा देत होते. सुधीर मुनगंटीवार उपमुख्यमंत्री निवेदन करीत असताना बोलण्याचा प्रयत्न करीत होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com