कोकणातील पुरग्रस्तांना दोन हजार कोटी अर्थसाह्य करा! - Government shall give 2000 crore in flood affected Area; Nashik Politics   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

कोकणातील पुरग्रस्तांना दोन हजार कोटी अर्थसाह्य करा!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 जुलै 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पुरग्रस्तांच्या मदीतासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करावे अशा सूचना दिल्या आहेत. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना सामाजिक जाणीवेतून मदत करावी. व्यवसायिकांना दोन हजार कोटींचे बिगरव्याजी अर्थसाह्य करावे.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पुरग्रस्तांच्या मदीतासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करावे अशा सूचना दिल्या आहेत. (MNS Chief Raj Thakre Appeal for Konkan flood affected people) कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना सामाजिक जाणीवेतून मदत करावी, (Every one Shall help in social cause) या त्यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. (Party workers actively take initiative) नाशिकसह राज्याच्या विविध भागातून मदत पाठवली जाणार आहे.

यासंदर्भात मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या सुचनेनुसार मुंबईत शिवडी- भायखळा विधानसभा मतदारसंघ आणि एकलव्य फाऊंडेशनच्या अद्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या वतीने सहाय्यता सामग्री पुरग्रस्त भागात जाऊन सुपुर्त करण्यात येणार आहे. 

पुरग्रस्तांना सहाय्यता सामग्रीत अन्नाची पाकीटे, प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे,सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या भांडी यांचा समावेष आहे. पुरग्रस्त भागात त्याचे वाटप केले जाईल. नाशिक, पुणे तसेच अन्य भागातून देखील मदत संकलीत करण्यात आली आहे. त्यात तांदूळ, गहू, बिस्कीटे आदींचा सामवेष आहे. पुरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे मदतीचे आवाहन त्यांनी केले. 

आर्थसाह्य करावे
श्री. नांदगावकर म्हणाले, सध्या पुरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्यापारी व व्यावसायिकांचे त्यात मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यावसाय पुर्ववत करण्यासाठी त्यांना राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचे बिगरव्याजी अर्थसाह्य करावे. सध्या नागरिक अडचणीत असल्याने राज्य शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.
...   

हेही वाचा...

छगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास विकेंड लाॅकडाउन कायम`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख