राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे हे तर सर्वांचे बॉंस!

छगन भुजबळ पालकमंत्री आहेत. त्यांचा तर आशीर्वादमिळेलच, मात्र त्यांचे बॉस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री ठाकरे यांचेही सहकार्यमिळेल. तुम्ही हाती घेतलेले काम निश्‍चित यशस्वी व पूर्ण होईल.
Rajyapal
Rajyapal

नाशिक : तुम्ही सेवेसाठी एक पाऊल टाकले आहे. हे पाऊल आणखी पुढे टाकले तर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद  मिळेल. छगन भुजबळ पालकमंत्री आहेत. त्यांचा तर मिळेलच, मात्र त्यांचे बॉस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री ठाकरे यांचेही आर्शिवाद मिळतील. तुम्ही हाती घेतलेले काम निश्‍चित यशस्वी व पूर्ण होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

सटाणा येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नुतनीकरणाच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. त्यांनी संयोजक व नगराध्यक्ष सुनिल मोरे तसेच देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बबागड यांचे या उपक्रमासाठी कौतुक केले.  ते म्हणाले, देवमामलेदार एक अधिकारी होते. त्यांना वंदनीय माननारे हे शहर आहे. त्यांचा आदर्श शंभर टक्के शक्य नसेल तर किमान पन्नास टक्के अंगीकारला तरी खुप मोठे काम होईल. श्री. मोरे यांनी सेवेचे पाऊल टाकले आहे. त्यांना कृषीमंत्री दाद भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॅा. सुभा, भामरे यांचेही सहकार्य मिळेल. मात्र आणखी थोडे पुढे आले तर पालकमंत्री भुजबळ यांचे बॉंस अर्थात सगळ्यांचेच बॉंस असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री ठाकरे या सगळ्यांचे सहकार्य मिळले. राज्यपालांच्या या विधानवर उपस्थितांत किंचीत हास्याचे भाव कानी पडले.    

राज्यपाल म्हणाले, समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील  त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा. एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात. आपल्यातल्या देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतानी दिला आहे. हा आदर्श देवमामलेदार यांच्या जीवनातून घ्यावा. त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रबोधनीत ते पोहचविण्याचा प्रयत्न करु. देवमामलेदाराच्या जीवन चरित्रावर आधारीत लघूपट निर्मितीसाठी निधी देण्याचेही सहकार्य करण्यात येईल. 

राज्यपाल पुढे म्हणाले, चांगले जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करुन राज्यपाल म्हणाले, रामासोबत वानरसेना होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेवून साम्राज्य उभे केले. अशाच प्रकारे सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यशवंत महाराज यांचा शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श समोर ठेवल्यास  देश घडविता येईल. जीवनात ऊंची गाठण्यासाठी हा सेवाभाव आवश्यक आहे.  

यावेळी अन्न व नागरी  पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, माजी मंत्री जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल,  पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com