गणपतराव देशमुख निधन; ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ काळाच्या पडद्याआड 

सांगोला मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ आणि एक जेष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला.
Ganpatrao Deshmukh
Ganpatrao Deshmukh

नाशिक : सांगोला मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने (Sangola constituency`s Ex MLA, Senior leader Ganpatrao Deshmukh No more) चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला (He had a attachment with four generations) ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ आणि एक जेष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला, अशा शोक भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केल्या आहेत.

मंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, साधी राहणी व स्वच्छ प्रतिमेमुळे गणपतराव हे राजकारणातील आदर्श दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते.त्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचला होता. दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी हा विक्रम देखील मोडित  

कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द होती. साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनानंतर राजकारणाचा बाज हा पक्षाची ध्येयधोरणे व वैचारिक पायावर आधारित आहे. मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळविणे हा आमदारांचा एकमेव उद्देश कदापि असू शकत नाही, हे त्यांनी साडेपाच दशकांच्या ध्येयवादी राजकारणातून दाखवून दिले. 

विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख निर्माण करत सभागृहात त्यांनी आदर्श निर्माण केला होता.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय देशमुख कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटलेले आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com