दिल्ली आंदोलन : शरद पवार, ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत सभा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींब्यासाठी किसान सभेतर्फे सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा होईल. शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित राहतील.
Pawar-Thakre-Thorat
Pawar-Thakre-Thorat

नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींब्यासाठी किसान सभेतर्फे आज नाशिकहून  मुंबईकडे वाहन मार्च रवाना होणार आहे. सोमवारी सकाळी अकराला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा होईल अशी माहिती किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.

या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहतील. दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या किसान मार्चचे नेते माजी खासदार हनन मोल्ला हेही शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी दोनला राजभवनाकडे कष्टकरी कूच करतील आणि राज्यपालांना मागण्यांचे निवेदन देतील. 

या वेळी राज्याचे अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, उपाध्यक्ष सुनील मालुसरे आदी उपस्थित होते. डॉ. ढवळे म्हणाले, की केंद्र सरकारने कॉर्पोरेटधार्जिणे व शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्यावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यास समर्थन म्हणून नाशिकमधून निघणाऱ्या मार्चमध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय यांच्यासह शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, तरुण सहभागी होतील. शनिवारी (ता. २३) सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्काम असेल. रविवारी कसारा घाट उतरून मार्च मुंबईकडे निघेल. 

प्रजासत्ताकदिनी सांगता 
डॉ. ढवळे म्हणाले, की प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर ध्वजवंदनाने आणि राष्ट्रगीत गाऊन शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून महामुक्कामाची सांगता होईल. या मार्चमध्ये पन्नास  हजार जणांचा सहभाग राहणार आहे. राज्यातील शंभरहून अधिक संघटनांतर्फे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे झेंड्याखाली मुंबईतील महामुक्काम आंदोलन होईल. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या पाच व्यासपीठांतर्फे संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा होणार आहे. 

राज्य सरकारला स्मरण देणार 
वाहन मार्च आणि महामुक्काम हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात आहे. पण त्याच वेळी महात्मा फुले कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा याची आठवण राज्य सरकारला करून देण्यात येणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान-गायरान-आकारीपड-बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, अशा मागण्या केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com