एकनाथ खडसे उद्या ईडी कार्यालयात जाणार  - Eknath Khadse will go to the ED office tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसे उद्या ईडी कार्यालयात जाणार 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

डॉक्‍टरांनी त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांची उद्या (ता.15) सक्तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी ते स्वत: हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) खडसे यांना नोटीस बजावली आहे. ता. 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी त्यांना मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

या चौकशीसाठी खडसे मुंबईला ता. 27 डिसेबरला रवाना झाले होते. त्या ठिकाणी त्यांना कोरोनची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची "कोरोना' चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. 

याबाबत त्यांनी ईडी कार्यालयास कळवून मुदत मागून घेतली होती. त्यांनीही त्यांची मुदतवाढीची मागणी मंजूर केली होती. त्यांना देण्यात आलेली मुदत आता संपली आहे. ईडी कार्यालयाने चौकशीसाठी उद्या (ता. 15) हजर राहण्याचे कळविले आहे. 

खडसे स्वत: हजर राहणार 

एकनाथ खडसे मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी स्वत: हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की खडसे स्वत: मुंबईतील "ईडी' कार्यालयात चौकशीसाठी उद्या (ता. 15) सकाळी अकरा वाजता जाणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख