पदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर केला. मंत्री या नात्याने जनतेच्या हिताची काळजी न घेता पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना जमीन विकत घेण्यास खडसे यांनी मदत केल्याचे न्या. दिनकर झोटिंग यांच्या समितीने नमूद केले आहे. खडसे यांना समितीने दोषी ठरविले आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर केला.(Ex Revenue minister missuse his power) मंत्री या नात्याने जनतेच्या हिताची काळजी न घेता पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना जमीन विकत घेण्यास खडसे यांनी (He use his office for avail a land in pune for wife & Son in law) मदत केल्याचे न्या. दिनकर झोटिंग (Justice Zoting commision found him guilty) यांच्या समितीने नमूद केले आहे. खडसे यांना समितीने दोषी ठरविले आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भोसरी येथे खरेदी केलेली ही जमीन  शासकीय पदाचा गैरवापर करुन विकत घेतली गेली होती, असे या अहवालात स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे. सदरच्या जमिनीचा मोबदला मालकाला देवून ती पुन्हा पत्नी-जावयाच्या मार्फत विकत घेणे, हा महाराष्ट्र औद्योगिक वसाहत कायदा १९६१ ला फासला गेलेला हरताळ असल्याचे न्या. झोटिंग यांनी ३३६ पानाच्या अहवालात नमूद केले आहे. १२ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या कार्यवाहीनंतर २५ मे २०१६ च्या ‘सकाळ’च्या अंकात यासंबंधी वृत्त छापून आल्याने हा प्रकार जनतेसमोर आल्याचेही अहवालात नमूद केले आहे. खडसे यांनी पदाचा गैरवापर केला असे हा अहवाल नमूद करतो. मंत्री आणि व्यक्ती असे दुहेरी परिमाण या संपूर्ण व्यवहाराला लाभले असून ३१ कोटींचे बाजारमूल्य असलेली ही जागा केवळ ३.७५ कोटींना खडसेंच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचे उघड झाले आहे.

खडसेंना व्यवहाराची कल्पना
पत्नी आणि जावयाने खरेदी केलेल्या या जागेची आपल्याला माहिती नव्हती अशी भूमिका एकदा खडसे यांनी घेतली. आपण मुंबईत होतो अन्‌ पत्नी कोथळी या गावी असल्याने या व्यवहाराची माहिती नव्हती असे खडसे यांनी भासवले. तरी हा व्यवहार सुरु असतानाच्या अडीच महिन्याच्या काळात खडसे पती-पत्नींचे बोलणे आणि भेटी झाल्या आहेत. ते स्वत: या व्यवहारापासून अनभिज्ञ होते हे पटण्यासारखे नाही असेही न्या. झोटिंग यांनी नमूद केले आहे. व्यक्तिगत उद्दीष्टांपेक्षा सरकारचे हित जपणे या तत्वाला हरताळ फासला गेला, असेही स्पष्ट शब्दात लिहिण्यात आले आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com