सहज भेट झाली तर त्यावर पतंग उडवू नका!

माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे हे कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मनसे, भाजप युतीची शक्यता फेटाळून लावली.
सहज भेट झाली तर त्यावर पतंग उडवू नका!
Vinod Tawde

कल्याण : माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) हे कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आले होते. (today Shree Tawde made a interaction with party workers) यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. (He deliver a speech) तेव्हा त्यांनी मनसे, भाजप युतीची (he reject possiblity MNS-BJP Alliance) शक्यता फेटाळून लावली. 

ते म्हणाले, उगीच कुठे तरी योगायोगाने विश्रागृहावर भेट झाली. त्यात बोलणे झाले. त्यावरून काहीही संदर्भ नसलेल्या चर्चा करणे बरोबर नाही. नाशिक शहरात भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते पाहता आमची स्थिती अतिशय चांगली आहे. मनसेकडून देखील त्यांनी नाशिक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते विनोद तावडे हे राज्यातील राजकारणाच्या मुख्यप्रवाहातून बाहेर आहेत. त्यामुळे त्यांना मनसेच्या युती बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचाराला. त्यावर त्यांनी सांगितले की, माझ्याकडे हरियाणा राज्याची जबाबदारी होती. महाराष्ट्रामध्ये दहा  दिवस प्रवास असतो, यापुढेही असणार. 

मनसे भाजप युतीवर त्यांनी सांगितले की, सहज कोणाची भेट झाली यावर पतंग उडवण्यात अर्थ नाही. नाशिकमध्यें मनसेच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याच प्रकारे काम करीत राहील.

त्यामुळे त्यात अधिक लक्ष घालावे लागले. त्यामुळे स्थानिकांशी थोडा संपर्क कमी झाला होता. त्यासाठी प्रवास करावा लागतो. यापुढेही तसा प्रवास राहणारच आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊ सक्रीय झाल्याचा मुद्दा त्यांनी खोडला. 
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in