प्रीतम मुंडेंच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका!  - Don`t create roummers of Pritam Munde unhappy, Maharashtra politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

प्रीतम मुंडेंच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात कार्यक्षमता पाहून स्थान देण्यात आले आहे. डॉ प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी कुठेही नाराज व्यक्त केलेली नाही. उगीचच त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिक : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात कार्यक्षमता पाहून स्थान देण्यात आले आहे. डॉ प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी कुठेही नाराज व्यक्त केलेली नाही. उगीचच त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

श्री. फडणवीस नाशिक महापालिकेच्या बससेवेच्या उद्‌घाटनासाठी आले होते. उद्‌घाटन समारंभानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न केला असता, त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले. केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात राज्याला चांगले स्थान मिळाले आहे. राज्यात शिवसेनेची कोंडी करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे काय? यावर ते म्हणाले, नारायण राणे हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांना प्रदिर्घ राजकीय अनुभव आहे. त्यांचा स्वतःचा मोठा अनुभव विचारात घेऊन वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करूनच त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले असावे. त्यामुळे माध्यमांतून येणाऱ्या याबाबतच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही. 

मंत्रीमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे त्या नाराज आहेत का?. याबाबत मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी विचारणा केली असता, श्री. फडणवीस यांनी याबाबतच्या चर्चेला काहीच अर्थ नाही. स्वतः प्रितम मुंडे यांनी याबाबत कुठेही नाराजी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे प्रसामाध्यमांनी त्या नाराज असल्याच्या वावड्या उठवू नये. ही चर्चा इथेच थांबवा, असे सांगून त्यावर पुढे संवाद टाळला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, यांना पुन्हा एकदा पुणे येथील जमीन खरेदी संदर्भातील प्रकरणात "ईडी"कडून नव्याने चौकशीचे समन्स काढले आहेत. तसेच त्यांच्या जावयाला अटक केली आहे. ही राजकीय सुडाची कारवाई असल्याचे बोलले जाते. त्यावर फडणवीस यांनी त्याचा इन्कार केला. ते म्हणाले. ही चौकशी यापुर्वीच सुरु होती. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम करीत आहेत. तो कायद्याचा भाग आहे. त्यात सुडाचा विषय येत नाही. कायदेशीर प्रक्रीयेनुसार त्याबाबत कारवाई होत असते. 
.... 
हेही वाचा...

भारती पवारांचे मंत्रीपद...सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख