युसूफ भाईंची (दिलीप कुमार)  `ती` इच्छा राहिली अपूर्ण!

युसूफ भाई अर्थात समस्त चित्रपटप्रेमींच्या ह्रदयात स्थान असलेले लाडके अभिनेते,ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार. त्यांचे कुटुंब येथील देवळालीचे. येथील मिलीटरी डेअरी फार्म समोर सुन्नी कब्रस्तानमध्ये त्यांची आई, वडिलांचे दफन करण्यात आले. `त्यांच्या मधे मला दफन करावे` ही दिलीप कुमार यांची इच्छा होती. त्यासाठी आई आणि वडिलांच्या कबरींमध्ये जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र आता त्यांची `ती` इच्छा अपूर्ण राहणार आहे.
Dilip kumar
Dilip kumar

नाशिक  : युसूफ भाई अर्थात समस्त चित्रपटप्रेमींच्या ह्रदयात स्थान असलेले लाडके अभिनेते,ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार. त्यांचे कुटुंब येथील देवळालीचे. (Actor dilip kumar`s ancestral from Devlali cantonment) येथील मिलीटरी डेअरी फार्म समोर सुन्नी कब्रस्तानमध्ये त्यांची आई, वडिलांचे दफन करण्यात आले. (His mothr, father`s Grave at Devlali`s Sunni kabrastan) `त्यांच्या मधे मला दफन करावे` ही दिलीप कुमार यांची इच्छा होती. (He kept place reserve for his grave between mothr & Father) त्यासाठी आई आणि वडिलांच्या कबरींमध्ये जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र आता त्यांची `ती` इच्छा (Wish will be incomplete) अपूर्ण राहणार आहे. 

ट्रॅजेडी किंग व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज सकाळी मुंबईत हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. हे दिलीप कुमार अर्थात युसूफ भाई यांचे कुटुंब मुळचे देवळाली लष्करी कॅन्टोनमेंट येथील रहिवासी आहे. त्यांच्या आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवर खान यांचे ते सुपुत्र होते. त्यांचा जन्म १९२२ मध्ये पेशावर येथे झाला. १९३६ च्या सुमारास ते देवळालीला स्थलांतरीत झाले. १९४४ मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देवळाली परिसरात झालेले आहे. त्यात `गंगा जमुना` हा प्रमुख चित्रपट आहे.    

दिलीप कुमार यांचे कुटुंब फाळणीपूर्वीच भारतात आले व देवळालीला स्थायीक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी सामरीक सोयीसाठी अफगानीस्तान- पाकीस्तानच्या सीमेवरील क्वेट्टा येथील आपले तोफखाना केंद्र (सध्याचे स्कुल ऑफ आर्टीलरी) देवळालीला हलवले. आल्हाददायक थंड हवेचे ठिकाण, जंगल व डोंगर यामुळे तोफखान्याचे प्रशिक्षण व सरावासाठी हे गाव त्यांना सोयीचे वाटले. तोफखाना केंद्रामुळे लष्कराचे कॅन्टोनमेंट (छावणी) आली. त्यात लष्कराशी संबंधीत अनेक व्यवसायिक आले. त्यात हे खान कुटुंब होते. बालपणी दिलीपकुमार कुंटुबाच्या लष्करी अधिकाऱ्यांना फळे विक्रीच्या व्यवसायात मदत करीत असत. 

अभिनयाची गोडी लागल्यावर ते मुंबईला गेले. तेव्हा त्यांचे आई, वडिल व भाऊ देवळालीतच राहिले. सध्या त्यांच्या कुटुंबातील पुतणे येथील आनंद रोडला राहतात. मुस्लीम समाजाचे कब्रस्तान येथे लष्कराच्या डेअरी फार्मलगत आहे. या सुन्नी कब्रस्तानमध्ये खान कुटुंबियांच्या दिवंगत सदस्यांचा दफनविधी करण्याची परंपरा आहे. नाशिकचे हवामान आवडल्याने त्यांनी शहरालगत गंगापूर गावाजवळ शेतीही घेतली होती.

पूर्वी दिलीप कुमार नियमितपणे नाशिकला  येत असत. आपल्या शेतीत रमत असत. कुटुंबियांना भेटत. आई वडिलांच्या कबरीचे दर्शन घेत असत. आपल्या आई- वडिलांच्या आठवणींनी ते हळवे होत असत. त्यांच्या कबरीजवळच आपलाही दफन विधी करावा. त्यांच्या सानिध्यात मला स्वर्गप्राप्ती (जन्नत) मिळेल अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे आई- वडिलांच्या कबरींच्या मध्ये त्यांच्यासाठी जागा राखील ठेवण्यात आली आहे. 

आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी देवळालीत त्यांच्या दफनविधीची तयारी केली होती. मुंबईत त्यांनी संपर्क देखील साधला. मात्र दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी त्याला नकार देत जुहू येथे दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आता मुंबईला जात आहोत, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे युसूफ भाईंची देवळालीला आई- वडिलांच्या शेजारी दफन करा `ही ` इच्छा अपूर्णच राहिली. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com