चित्रपटसृष्टीतील एक अध्याय संपला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनय सम्राट जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अध्याय संपला आहे. दिलीप कुमार यांनी अजरामर भूमिका साकारून अनेक दशके चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Sayra Bano
Sayra Bano

नाशिक : भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनय सम्राट जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अध्याय संपला आहे. (Dilip kumar`s death is end of one era of Film industry) दिलीप कुमार यांनी अजरामर भूमिका साकारून अनेक दशके चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.

श्री. भुजबळ यांनी आज मुंबईतील दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले असून त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील महानायक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे. 

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीतील इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ट्रॅजडी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. सर्वाधिक पुरस्कार जिंकण्यासाठी दिलीप कुमार यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. दिलीप कुमार पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची अपरिमित अशी हानी झाली असून एक कलागुण संपन्न अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com