लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे! - Democracy in danger, we should protect it; Mumbai Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज काँग्रेसतर्फे राजभवन परिसरात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांणी परिसर दणाणूण सोडला.

मुंबई : पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. (In maharashtra & country phone tapping is on with pegasus Software) त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. (due to phone tapping Democracy in danger) याबाबत तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज काँग्रेसतर्फे (Congress agitation at Rajbhavan) राजभवन परिसरात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांणी परिसर दणाणूण सोडला.

प्रदेशाध्यक्ष नान पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी देशात पत्रकार व राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून हेरगिरी केली जात आहे. महागाई वाढली आहे. सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली. 

काँग्रेस नेत्यांनी राजभवनचा परिसर दणाणून सोडला होता. अचानक हे आंदोलन झाले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांसह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसह ते राजभवनमध्ये दाखल झाले.  त्यानंतरही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती. यावेळी एकतीस जणांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन चर्चा केली. 

यावेळी श्री. पटोले म्हणाले, पेगासेस यंत्रणेचा गैरवापर करून राज्यात व देशात फोन टॅपिंग केले जात आहे. या प्रकरणी आणि महागाई विरोधात  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळाने निवेदन दिले. राजभवनासमोर आंदोलन केल्यावर ते राज्यपालांना भेटले. 

यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, आमदार, नगरसेवक सहभागी
झाले. राज्यपालांनी परवानगी दिल्यावर काँग्रेसचे ३१ जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेले. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

ते पुढे म्हणाले, राज्यात देखील फोन टॅपिंग केली जात आहे. राज्यपालांना निवेदन दिले आहे.. देशातील व राज्यातील अनेक नेते, पत्रकारांचे फोन टॅप केले होते. लोकशाहीचा खुन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही विरोध केला आहे. आज लोकशाही धोक्यात आली आहे.  ती वाचवली पाहीजे. त्यासाठी याबाबत तातडीने चौकशी झाली पाहीजे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एका समितीची स्थापना केली आहे. राज्यपाल यांनी याबाबत सांगतो असे बोलले आहेत. 

ते पुढे म्हणाले, विधीमंडळाचे कामकाज महत्वाचे आहे. विधानसभेत जो गोंधळ झाला, त्यानंतर तालिका अध्यक्षांना त्यांच्या कक्षात जाऊन भाजप सदस्यांनी शिव्या दिल्या आहेत. ही लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम त्यांनी केले. विरोधक जरी कोर्टात गेले असले, तरी विधानभवनाकडे काही अधिकार आहेत.

संकटात सरकार जनतेसोबत
यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले, राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती आहे. या आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी यंत्रणा काम करते आहे. मुंबईसह पूरस्थिती असलेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे  जवान पोहचले आहेत. कोस्टल टीम देखील पोचली काहे. संकटाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकणात दोनदा चक्रीवादळ आले, तेव्हा सरकारने मदत केली. नैसर्गिक संकटात सरकार जनतेसोबत आहे.
...

हेही वाचा...

आम्ही पाणी मागितले, अजितदादांनी धरण दिले!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख