माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांचा स्वगृही राष्ट्रवादीत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दोंडाईचा येथील माजी मंत्री, काँग्रेसचे नेते डॉ हेमंत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Hemant Deshmukh
Hemant Deshmukh

दोंडाईचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP national President Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दोंडाईचा येथील माजी मंत्री, काँग्रेसचे नेते डॉ  हेमंत देशमुख (Dondaicha`s congress leader Dr Hemant Deshmukh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (Joins NCP today)  केला. 
 

डॅा. देशमुख मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र गेले काही दिवस ते पक्षाच्या नेत्यांवर नाराज होते. यातूनच दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. बैठकी दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशामुळे दोंडाईचा शहर पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी दोंडाईचा पालिकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 
 

मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
...  
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com