काँग्रेसचा उपमुख्यमंत्री हा विषय आणला तरी कोणी? - Congress dy CM issue is roumers. Balasaheb Thorat Politics | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री हा विषय आणला तरी कोणी?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री हा विषय कुठून आला हे माहिती नाही; पण येत्या विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होईल, असा निर्वाळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिला.

नाशिक : काँग्रेसचा उपमुख्यमंत्री हा विषय कुठून आला हे माहिती नाही; पण येत्या विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होईल, असा निर्वाळा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिला. 

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना श्री. थोरात यांनी इंधन दरवाढीप्रश्नी केंद्र सरकारवर नफेखोरीचा आरोप केला. ते म्हणाले, की इंधन दरवाढीमुळे महागाईचे चटके सामान्यांना बसणार आहेत. पण इंधन दरवाढीतून मिळणारा पैसा केंद्र कुठे खर्च करतेय, असा प्रश्न तयार झाला आहे. महाराष्ट्राचे जीएसटीचे आणखी ३० हजार कोटींचे केंद्राकडून येणे आहे. महागाईमुळे सामान्य माणूस केंद्रातील सरकारवर नाराज झाला आहे. 

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री हा विषय कोणी काढला हेच अजुन कळलेले नाही. काँग्रेस पक्षात अशी चर्चा झालेली नाही किंवा आम्ही कोणी असा प्रस्ताव देखील दिलेला नव्हता. माध्यमांतून मात्र गेले काही दिवस यावर चर्चा होत आहे. त्याबाबत आम्हाला देखील बातम्या आल्यावरच कळले. असा प्रस्ताव आमच्याकडे कधची नव्हता असे थोरात यांनी स्पष्ट केले.   

दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देऊन श्री. थोरात म्हणाले, की वर्ष कठीण गेले. चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टीचे संकट कोसळले. राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. कोरोना संकटात सरकार जनतेसोबत राहिले.  
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख