मुंबईतील पाऊस...मुख्यमंत्र्यांनी तज्ञ, लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी - Cm Should call expert, representitives meeting, Mumbai Politics | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईतील पाऊस...मुख्यमंत्र्यांनी तज्ञ, लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेल्या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. 
 

मुंबई : भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. (Bhandup water filteration plant under water) समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेल्या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. ( I never seen such situation in last 25 years) त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याचा तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केली. 

आमदार अॅड शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे.
ते म्हणाले, मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली २५ वर्षे काम करीत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असंही ते म्हणाले.
मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? 

ते पुढे म्हणाले, एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

हा राजकारणाचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे.

मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात  पाटावर आणून ठेवायचं आहे काय?शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
...
हेही वाचा...

केंद्राने ओबीसी आरक्षणावर भूमिका न घेतल्यास आंदोलन

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख