छगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. राज्य शासनाला तसा प्रस्तावही पाठविला आहे. मात्र तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम राहणार आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing so praposal of relaxation in weekend lockdown is send to government)  राज्य शासनाला तसा प्रस्तावही पाठविला आहे. मात्र तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम राहणार आहे. (Relaxation in lockdown will be only after Government permission) शासनाकडून परवानगी आल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

कोरोना आढावा बैठकीनंतर श्री. भुजबळ बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापलिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्याचा कोरोना संसंर्गदर कमी झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही घटत आहे. त्यामुळे शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करावा, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरू आहे. दोन दिवसांपैकी एक दिवस निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य टास्क फोर्सला प्रस्ताव द्यावा. त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

किमान एक दिवसाचा विचार
राज्य शासनाच्या परवानगी नंतरच वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय होणार आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउनमधील एक दिवस शिथिल करावा, खरेदीच्या कामकाजाच्या वेळा वाढवाव्यात. यासारख्या अनेक मागण्यांबाबत प्रशासन विचार करीत आहे. मात्र हे सगळे विषय राज्य शासनाच्या परवानगीचे असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

चित्रीकरणाला परवानगी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने त्र्यंबकेश्वर व नाशिकला चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल. जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी पर्यटनाला वाव असल्याने चित्रीकरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना शून्य रुग्णसंख्या असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली असली तरी, जर संबंधित गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर, मात्र शाळा बंदचा पर्याय असल्याचे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार नाही याची त्या त्या भागातील लोकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
रस्त्यांवरील गर्दी चिंताजनक

तत्पूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दर घटला आहे. मात्र रस्त्यावर गर्दी होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आठवड्यातील सहा दिवस कामकाज सुरू ठेवता येईल का, याचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com