छगन भुजबळ म्हणाले,  `त्यांना` विनोदाची हुक्की आली असावी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक छगन भुजबळ यांनीही त्याची दखल घेतली. त्यांनी श्री. लाड यांचा समाचार घेतला, मात्र अनुल्लेखाने!
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : भाजपचे नेते प्रसाद लाड यांची जीभ घसरली अन् महाराष्ट्राला चर्चा, वाद-विवादासाठी एक विषय देऊन गेली. (BJP leader Prasad lad`s tongue sleep 7 given a political issue to Maharashtra)  `वेळ आली तर शिवसेना भवन फोडू` (he said If time came we will ssmash Shivsena Bhavan)असे विधान त्यांनी केले होते. त्यावरून चांगलाच गहजब झाला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही त्याची दखल घेतली. त्यांनी श्री. लाड यांचा समाचार घेतला, मात्र अनुल्लेखाने!

श्री. लाड यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, आम्ही माहीमला आलो की, यापुढे जास्त कार्यकर्ते आणायची गरज नाही. कारण आपल्यापेक्षा पोलिसच जास्त असतात. यापुढे त्यांनाच साध्या वेषात सभागृहात बसवू. सभागृह भरून जाईल. त्यांना वाटते की माहीमला आलो म्हणजे, शिवसेना भवन फोडायलाच आलो. वेळ आली तर तेही फोडू` असे विधान असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या विधानावरून खुद्द भाजपच्या विविध नेत्यांना त्यावर बोलावे लागले. शिवसेनेच्या नेत्यांनी त्याचा चांगलाच आक्रमक समाचार घेतला. शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकातून देखील त्यावर तिखट प्रतिक्रीया आली. मुख्यमंत्र्यांनी दबंग सिनेमातील `थप्पड से डर लगता है` या संवादाचा आधार घेतला होता.

जवळ जवळ सर्वच नेत्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिल्यावर श्री. लाड यांनाही गांभिर्याची जाणीव झाली असावी. त्यांनी मला तसे म्हणायचे नव्हते. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हटले आहे. यासंदर्भात वाहिन्यांच्या पत्रकारांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि मूळचे आक्रमक शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळ यांनाही याबाबत प्रतिक्रीया विचारलीच.

त्यावर श्री. भुजबळ यांनी प्रारंभी त्यावर बोलण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा विचारल्यावर ते म्हणाले, `कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते`. हे सांगतांना त्यांनी श्री. लाड यांचा उल्लेख मात्र टाळला. थोडक्यात त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता एक प्रकारे अनुल्लेखानेच लाड यांना हिणवले.
....
 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com