`ओबीसी` आरक्षणासाठी भुजबळ फडणवीसांच्या भेटीला

गेले काही दिवस रस्त्यापासून तर विधानसभेपर्यंत गाजत असलेल्या `ओबीसी` आरक्षणाच्या प्रश्नावर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे हा विषय कोणते वळण घेतो याची चर्चा सुरु झाली आहे.
CB-DF
CB-DF

नाशिक : गेले काही दिवस रस्त्यापासून तर विधानसभेपर्यंत गाजत असलेल्या `ओबीसी` आरक्षणाच्या (OBC Reservation is a hot political issue) प्रश्नावर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (On this issue Today Chhagan Bhujbal meets Devendra Fadanvis today) यांची भेट घेतली. त्यामुळे हा विषय कोणते वळण घेतो (This meeting will may turning point to this issue) याची चर्चा सुरु झाली आहे. 

आज श्री. भुजबळ यांनी श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ देखील त्यांच्यासमवेत होते. यावेळी `ओबीसीं`च्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे सूत्रांनी कळविले आहे. 

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक श्री. भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात त्यांच्या संस्थेने ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माजी खासदार समीर भुजबळ यांनी यासंदर्भात केंद्र शासनाने जनगणना करावी, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने  पाठपुरावा केली होता. केंद्रीय मंत्री (कै) गोपीनाथ मुंडे यांच्यासह विविध नेत्यांनी शंभर खासदारांचा दबाव गट निर्माण केला होता. त्यातूनच यासंदर्भात ओबीसींचा डेटा संकलीत करण्याचे काम सुरु झाले होते. मात्र हा इम्पिरीकल डेटा केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालायत दाखल न केल्याने ओबीसी घटकांचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायेन नुकताच दिला होता. 
या विषयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. श्री. भुजबळ यांसह राज्य सरकारमधली घटकांनी केंद्र सरकारने इम्पिरीकल डेटा दिला नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झाले, अशी भूमिका घेतली होती. नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात श्री. भुजबळ यांनी राज्य सरकारच्या वतीने केंद्र शासनाने इम्पिरीकल डेटा द्यावा यासाठी अधिकृतपणे ठराव मांडला. तो एकमताने मंजूर झाला होता.

यावेळी श्री. फडणवीस यांचे सर्व मुद्दे श्री. भुजबळ यांनी खोडले. त्यानंतर श्री. फडणवीस यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यावरून भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे भाजपचे १२ आमदार निलंबीत करण्यात आले. तेव्हापासून सत्ताधारी व श्री. फडणवीस यांच्या कटुता होती. या पार्श्वभूमीवर आज भुजबळ यांची भेट झाल्याने तो चर्चेचा विषय होता. 

श्री. भुजबळ यांची श्री. फडणवीस यांच्याशी भेट झाली, मात्र समता परिषदेचे नेते तसेच ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी फडणवीस यांच्यामुळेच ओबीसी आरक्षण गेले. असा आरोप करून फडणवीस यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. त्याला फडणवीस यांनी मात्र काहीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भुजबळांना भेटणारे फडणवीस नरकेंनाही भेटणार का ही चर्चा होत आहे.
...  
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com