छगन भुजबळ करू, या वाक्याची भिती संपली!

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांसह सहा जणांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले. या खटल्याने गेली सहा वर्षे भाजपसह त्यांचे विरोधक सतत टार्गेट करीत होते.
Chhagan Bhujbal F
Chhagan Bhujbal F

नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी (Maharashtra sadan scam) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांसह सहा जणांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले. (Special court discharged Chhagan Bhujbal & six others)  या खटल्याने गेली सहा वर्षे भाजपसह त्यांचे विरोधक सतत टार्गेट करीत होते. (He was politicaly targeted from last six years due to this case) 

ज्या कारणांनी दोषमुक्त झाले, ते पाहता केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना टार्गेट केले होते का?. तसे असेल तर महाराष्ट्रात सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या भाजपच्या मोहिमेचा अर्थात चक्रव्यूह भेदण्यात ते यशस्वी ठरले. मात्र ते करताना त्यांना दोन- सव्वा दोन वर्षे ऑर्थर रोड कारागृहात रहावे लागले होते. त्यामुळे सत्ताधारी आपल्या विरोधकांना सतत `तुमचा छगन भुजबळ करू` अशी भिती दाखवत असे. आता या वाक्याची भिती संपली आहे.   

छगन भुजबळ, त्यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ, पुतन्या माजी खासदार समीर भुजबळ यांसह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आले. अन्य खटले व विशेषतः ईडीचा खटला अजून सुरु आहे. मात्र त्याची सारी मदारच महाराष्ट्र सदन प्रकरणावर होती. त्यामुळे ईडीच्या खटल्यातील दावे कितपत तग धरणार हा प्रश्नच आहे.  

हा निर्णयाने गेली सहा वर्षे भुजबळ यांना सतत राजकीय टार्गेट करण्यात आले होते. या निकालाने केंद्रीय तपास यंत्रणा, प्रशासन यांच्या कामकाजावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. राजकीय नेत्यांना अडकविले जात होते व आहे का? अशी कुजबूज होती. आता या चर्चेला बळ देखील मिळू शकते. एकंदर या निकालाचे परिणाम भविष्यात दिसतीलच, मात्र हा भुजबळ विरोधकांना धीरेसे वगैरे नव्हे तर जोर का झटकाच आहे. 

या सर्व चर्चेचे कारण म्हणजे केंद्रातील सरकार व पंतप्रधान मोदींसह भाजपवर श्री भुजबळ आपल्या आक्रमक शैलीत राजकीय शेरेबाजी करण्यात पुढे असत. त्याने भाजपचे नेते निरुत्तर झाले नसते तरच नवल होते. यातूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच, `भुजबळ तुम्ही जामीनावर आहात हे विसरू नका` असे विधान केले होते. हे विधान दोन्ही अर्थाने बोलके होते. त्यामुळे त्याची चर्चा केली नाही तरी सगळ्यांना त्याचा दुहेरी मतीतार्थ समजला होता. आता तो अधिक उलगडला गेला आहे. 

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानतर त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लावला, असा आरोप सतत केला जातो. महाराष्ट्रात यासंदर्भात पहिले मोठे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ होते. महाराष्ट्र सदन प्रकरणात आधी `ईडी`ने त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तपासासाठी बोलावून अटक केली. त्यानंतर श्री. भुजबळ अमेरिकेत असताना त्यांना समन्स काढण्यात आले. ते अमेरिकेतून परतल्यावर तपासाला सामोरे गेले. तेव्हा त्यांनाही अटक करण्यात आली.

त्यानंतर `ईडी` च्या तपासातील तरतुदीत जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असताना, विविध तात्रीक विषय, मुद्दे पुढे करून त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था केल्याचा आरोप भुजबळ यांच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे सुमारे सव्वा दोन वर्षे त्यांना कारागृहात घालवावे लागले. ते जेव्हा बाहेर आहे तेव्हा भाजपने महाराष्ट्रात राजकीय वातावरण एव्हढे गढूळ केले होते, राज्यात भाजप सत्तेत असताना त्यांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षातील भल्या भल्या दिग्गजांचे पाय लटपटत होते. अनेकांनी त्यापुढे शरणागती पक्तरत राजकीय निष्ठा बाजूला ठेऊन भाजपवासी होण्यात धन्यता मानली होती. त्यामुळे बाहेर आलेले भुजबळ व त्यांचे सहकारी महात्मा फुले व निधर्मी विचाराला बांधील राहतील की भाजपमध्ये जातील अशी चर्चा देखील सुरु झाली होती. अनेकांना भुजबळ पुन्हा राजकारणाचे मैदान गाजवतील की नाही, अशी शंका वाटत होती.

यानंतर भुजबळ नाशिकला आले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. पुणे य़ेथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला  उपस्थित राहून त्यांनी आपलं मन मोकळं केल. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार हे संकेत दिले. हे संकेत आणि कालचा निकाल म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चक्रव्यूहाला भेदणारे ते पहिले अभिमन्यू!

श्री भुजबळ यांच्या १९९१ ते २०२१ या तीस वर्षाचा राजकीय प्रवास योगायोगाने शिवसेनेत असताना तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंडल आयोगातून ओबीसी वर्गाला राजकीय, सामाजिक आरक्षणातून प्रतिष्ठा देण्याचा तर आज केंद्रीय सरकारने हे चक्र उलटे फिरवत सर्वोच्च न्यायालयात ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांत राजकीय आरक्षणासंदर्भात इम्पीरीकल डाटा देण्यात केलेली खळखळ असा आहे. राजकारण व्यक्तीगत प्रतिमेतून अल्पकाळ चालते. मात्र मुद्दे व तत्वाचे राजकारण दिर्घकाळ यशस्वी होते. ओबीसी घटकांचे हक्कांचे प्रश्न वा राजकारण अद्याप संपलेले नाही. ते नवे वळण घेऊन एक संधी घेऊन आले आहे. त्यात भुजबळांना वेगाने पुढे जाण्याचे बळ निश्चित आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या असंख्य खटल्यांचे चक्रव्यूह भेदलेला हा अभिमन्यू या संधीचे सोने नक्कीच करणार यात राजकीय तज्ञांना तरी शंका नाही. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com