अनिल परब यांच्यावर लेटर बॅाम्ब टाकणारा अधिकारी स्वतःच अडकला!

आरटीओमध्ये बदली प्रकरणात तीनशे कोटींचा अपहार झाल्याची तक्रार करणाऱ्या येथील निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील, राहुल पाटील (सोनवणे) उर्फ दादा पाटील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे २२ जुलैला तीनशेवर पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
Anil Parab
Anil Parab

धुळे : आरटीओमध्ये बदली प्रकरणात तीनशे कोटींचा अपहार झाल्याची तक्रार करणाऱ्या येथील निलंबित (suspended RTO Officer who blaim On Minister Anil Parab) वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील (Rajendra Patil), राहुल पाटील (सोनवणे) उर्फ दादा पाटील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे २२ जुलैला तीनशेवर पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. (300 pages charge sheet)   खटला पुढील सुनावणीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. आहेर यांच्याकडे वर्ग झाला आहे.

दोघा संशयितांकडून जप्त केलेली मोटारकार, मोटार वाहन निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून धमकीची पत्रके शासकीय कार्यालयात वाटणे, सीसीटीव्ही चित्रणांसह विविध सबळ पुरावे गोळा करण्यात आले आहेत. गुन्ह्यात सबळ पुराव्याअंती मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
आक्षेपार्ह पत्रके टाकली

आरटीओ कार्यालयात एका व्यक्तीने पत्रके टाकली होती. त्याने ही पत्रके कार्यालयातील खिडक्यांमधून प्रत्येक लिपिक, आरटीओ एजंट यांच्या कार्यालयात टाकली होती. या पत्रकात एका आरटीओ निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि धमकीचा मजकूर होता. याबाबत पोलिसात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी आरटीओ कार्यालयात दाखल होऊन सीसीटीव्ही चित्रण तपासले. या चित्रणात पोलिसांना एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून पत्रके वाटताना दिसून आली. तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परिवहन मंत्र्यांकडून गंभीर दखल
ही घटना आरटीओ कार्यालयात घडल्याने या घटनेची दखल परिवहन मंत्र्यांनीही गांभीर्याने घेतली होती. त्यांनीच पोलिस यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी तपासाला वेग दिला. या प्रकरणात संशयित राहुल पाटील (रा. बोरविहीर), गजेंद्र पाटील (रा. दोनदिगर ता. चाळीसगाव) यांचा सहभाग उघड झाला. दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना पोलिस उपनिक्षक मुस्तफा मिर्झा यांनी चौकशीला बोलावून सर्व माहिती घेतली. संशयितांनी पोलिसांना सहकार्य न करता उडवा-उडवीची उत्तरे दिली. मिर्झा यांनी तपासाअंती कार जप्त केली. ही कार गजेंद्र पाटील यांच्या चुलत भावाच्या नावाने असली तरीही आरटीओ कार्यालयात या वाहनाचा क्रमांक निलंबित मोटार वाहन निरीक्षक पाटील यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाला जोडलेला आहे. सबळ पुरावे गोळा करुन सुमारे ३०० पानांचे दोषारोपपत्र तयार करुन ते न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक मिर्झा यांनी सरकारी अभियोक्ता के. एस. जगपती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले. मंजुरी मिळताच २२ जुलै रोजी दोषारोपपत्र दाखल केले.

तपासात सहभाग निष्पन्न
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी करत सीसीटीव्हीच्या आधारे गजेंद्र पाटील, राहुल पाटील यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेची परिवहनमंत्री अनिल परब यांनी दखल घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

अधिकार्‍यांना क्लीन चिट
उल्लेखनीय म्हणजे निलंबित वाहन निरीक्षक पाटील यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत पोलिस यंत्रणेने प्रादेशिक परिवहन आयुक्तांसह आरटीओ अधिकारी आणि इतर ५० जणांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली.
...
गुन्ह्याचा तपास करणे आव्हानात्मक होते. मात्र, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्‍लेषण तसेच अन्य सबळ पुरावे प्राप्त करून तपासाअंती दोन्ही संशयितांविरूद्ध सुमारे तीनशे ते साडेतीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार केले. ते न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
- मुस्तफा मिर्झा, तपास अधिकारी, मोहाडी पोलिस स्टेशन, धुळे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com