न्यायालयाचे निर्णय चंद्रकांत दादा घेऊ लागलेत की काय? - is Chandrakant patil take court`s decision, Maharashtra Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

न्यायालयाचे निर्णय चंद्रकांत दादा घेऊ लागलेत की काय?

संपत देवगिरे
सोमवार, 3 मे 2021

माझ्यावर जे खटले सुरु आहेत, त्याची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. न्यायालय त्याचा निर्णय देईल. मात्र मला भारी पडेल अशी विधाने भाजप नेते चंद्रकांत पाटील करीत आहेत. म्हणजे आता न्यायालयाचे निर्णय देखील तेच घेतात की काय? असे प्रतीप्रश्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

नाशिक : माझ्यावर जे खटले सुरु आहेत, त्याची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. न्यायालय त्याचा निर्णय देईल. मात्र मला भारी पडेल अशी विधाने भाजप नेते चंद्रकांत पाटील करीत आहेत. म्हणजे आता न्यायालयाचे निर्णय देखील तेच घेतात की काय? असे प्रतीप्रश्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

श्री. भुजबळ यांनी देशातील पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले होते. त्यावर भाजप नेते श्री. पाटील यांनी `तुम्ही जामीनावर बाहेर आहात. महागात पडेल` असे विधान केले होते. त्याचा श्री. भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील काहीही विधाने करू लागले आहेत.. मात्र त्यांनी आता पराभांची सवय लाऊन घेतली पाहिजे. पराभव पचवायाल शिकले पाहिजे, असा टोला भुजबळ यांनी लगावला. 

ते म्हणाले,   बंगालमध्ये ममतादीदी झाशीच्या राणीप्रमाणे `मेरा बंगाल नही दूंगी` या त्वेषाने एकाकी लढल्या. त्यांनी भाजपच्या नेत्यांचा मोठा फौजफाटा, साधने, यंत्रणा या सगळ्यांचा पराभव केला. त्याचे चंद्रकांत पाटील यांना राग येण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र पराभव पचविण्याची सवय नसल्याने त्यांना राग आला असावा. पण यापुढे त्यांना वारंवार असे पराभव पचावावे लागणार असल्याने त्यांनी त्याची सवय लावून घ्यावी, असा सल्ला मंत्री भुजबळ यांनी दिला.

श्री. भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानांतील फोलपणा माध्यमांसमोर मांडला. ते म्हणाले, पराभव पचवायची सवय नसल्याने चंद्रकांत पाटील काहीही बोलू लागले आहेत. माझ्या अटकेनंतर माझे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ चंद्रकांत पाटील यांच्याकडे विनंत्या करायचे, असेही म्हटल्याचे मी ऐकले आहे. वास्तविक समीर यांना माझ्या दोन महिने आधी अटक झाली होती. त्यानंतर मला अटक झाली. असे असतांना समीर भुजबळ काय जेलमधून चंद्रकांत पाटील यांना भेटायला जायचे का?, माझ्या अटकेनंतर समीर जेलमधून कसा भेटायला जाईल?. राहिला प्रश्न माझ्या मुलाचा, तो देखील कधीही भेटायला गेला नाही. पण सध्या चंद्रकातं पाटील उगाचच काहीही बोलू लागले आहेत. एकदा पराभव होऊ लागले की, असे होते. त्यामुळे त्यांनी पराभव पचवायची सवय करुन घेतली पाहिजे असेही श्री भुजबळ म्हणाले.

भारी पडेल कसे ?
ते म्हणाले, चंद्रकांत पाटील `मला भारी पडेल` असे म्हणाले. सीबीआय, ईडी  या संस्थाचा सत्ताधारी उपयोग करतात असे मी ऐकल होत. माझे सगळे खटले सध्या न्यायालयात सुरु आहे. न्यायालयात सुरु असलेल्या माझ्या खटल्यांबाबत मला भारी पडेल म्हणजे काय?. आता न्यायालयाचे निर्णय देखील चंद्रकांत पाटील ठरवू लागले आहेत का ?. न्यायालयाचे निर्णय घेणारे हे कोण?. असा प्रश्न त्यांनी केला. या विषयावर मला जास्त चर्चा करायची नाही. एव्हढ्या मोठया पराभवामुळे ताण- तणाव येउ शकतात. अशा ताणतणावातून ते बोलले असावे. म्हणूनच मी म्हणतो की, त्यांनी आता ताण-तणाव पचवायची सवय करुन घ्यावी.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख