आत्मनिर्भर भारत संकल्प पूर्ण करणारा अर्थसंकल्प  - Central budget is way to Atmanirbhar Bharat. Bjp politics | Politics Marathi News - Sarkarnama

आत्मनिर्भर भारत संकल्प पूर्ण करणारा अर्थसंकल्प 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

कोविड काळात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सावरताना फाईव्ह ट्रिलीयन अर्थव्यवस्थे कडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणारी  योजना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषित केली.

नाशिक : कोविड काळात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सावरताना फाईव्ह ट्रिलीयन अर्थव्यवस्थे कडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणारी  योजना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषित केली, असे भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप पेशकार यांनी सांगतिले.  

ते म्हणाले, हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी आहे. उद्योग, कृषी, शेतकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी क्षेत्रांना प्रगतीची दारे खुली करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. नाशिक व नागपूर मेट्रो साठी मोठी तरतूद व आरोग्य क्षेत्रासाठी दोन लाख 23 हजार कोटी, जल जीवन मिशन साठी दोन लाख 87 हजार कोटी, तर 35 हजार कोटी कॉमेट लसीसाठी हे प्रामुख्याने सांगावे लागेल. सात नवीन मेगा टेक्स्टाईल पार्क ची घोषणा रोजगार निर्मिती बरोबरच कृषी क्षेत्राला उभारी देणारी आहे. लघुउद्योगांना उभारी देताना डिमांड वाढवण्यासाठी अनेक उत्पादनावरील आयात शुल्क वाढवले आहे. स्टील व आलाँय यांची  भाववाढ रोखण्यासाठी आयात शुल्क कमी करून लघु उद्योगाला दिलासा दिला आहे. उद्योगासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे विज डिस्ट्रीब्यूशन कंपन्यांना स्पर्धा व्हावी या उद्देशाने दोन पेक्षा अधिक वीज वितरण कंपन्या असतील अशी योजना केली.

कंपनी कायद्यातील बदलाबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी विशेष योजना जाहीर केली. एकंदरच कोविड महामारीचे सावट असताना एकशे तीस कोटी भारतीयांना उभारी देणारा अर्थसंकल्प होय. त्यासाठी भाजपा उद्योग आघाडीतर्फे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अभिनंदन व आभार.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख