...तर नारायण राणेंना पुन्हा अटक होणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल महाड न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांनी नाशिक पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. सर्व प्रकारे सहकार्य करून २ सप्टेंबरला नाशिकला हजर राहण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात त्यांनी सहकार्य न केल्यास नाशिक पोलिस श्री. राणे यांना अटक करणार आहे. त्यामुळे राणेंसाठी आगामी काही दिवस ताणतणावातच जाणार आहेत.
Rane- Pande
Rane- Pande

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल महाड न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांनी नाशिक पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. सर्व प्रकारे सहकार्य करून २ सप्टेंबरला नाशिकला हजर राहण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात त्यांनी सहकार्य न केल्यास नाशिक पोलिस श्री. राणे यांना अटक करणार आहे. त्यामुळे राणेंसाठी आगामी काही दिवस ताणतणावातच जाण्याची चिन्हे आहेत. 

नारायण राणे यांच्या विरोधात पहिला गुन्हा नाशिक पोलिसांत दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे नाशिकचे पथक त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. यासंदर्भात आज पोलिस आयुक्तांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळीते म्हणाले,  आम्ही विनंती केली आहे. त्यानुसार श्री. राणे यांनी जबाब देण्यासाठी नाशिकला यायचे आहे. त्यांची सहकार्याची भूमिका असल्याने आम्ही त्यांचा आदर करतो.

एका प्रश्नाच्या उत्तरात आयुक्त पांडे म्हणाले, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे. माझं अल्प ज्ञान आहे. त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. श्री. राणे कलम २२६, २२७ अन्वये न्यायालयात दाद मागून आदेश रद्द करू शकतात. मी मात्र माझ्या आदेशावर ठाम आहे. मंत्री महोदयना आता बोलावले आहे. 

मंगळवारी घडलेल्या प्रकाराची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, नाशिक पोलिसांची टीम काल गेली होती. ती संगमेश्वर येथे पोहचली होती. तेव्हा त्यांना समजले की, रायगड पोलीस श्री. राणे यांना घेऊन गेले आहेत. न्यायालयातील सुनावणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. न्यायालयात नाशिक पोलिसांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यानुसार २ सप्टेंबरला हजर राहण्याची विनंती केली आहे. या विनंतीनुसार श्री. राणे यांनी नाशिक पोलिसांत यायचे आहे. ते सहकार्य करीत असल्याने आम्ही त्यांचा आदर करतो. गुन्हे रजीस्टर क्रमांक ३०/२१ मध्ये कायद्याचे जे कलम आहे, त्यानुसार आरोपींना स्वतः गुन्हेविषयक पुरावे दाखल करावे लागतात. त्याबाबत त्यांनी जर सहकार्य केले नाही, तर कारवाई करण्यात येईल. या नोटीसवर केंद्रीय मंत्री राणे यांनी सही देखील केली आहे. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर नियमानुसार त्यानुसार अटक होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. 

अटकेची स्पर्धा नाही
आयुक्त पांडे म्हमाले की, या प्रकरणात हेतू एवढाच होता की, दोन संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींबाबत भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आपण अटक करत होतो. मात्र न्यायालयात त्यांनी पुन्हा असे होणार नाही, असे सांगितले आहे.

आम्ही कायद्याच्या संरक्षणासाठी
श्री. पांडे म्हणाले, कायद्याच्या संरक्षणासाठी पोलिस विभाग आहे.त्याचेच पालन आम्ही करीत आहोत. श्री. राणे यांच्या अटकेच्या आदेशात बदल करून फक्त नोटीस दिली की, आपण नाशिकला 2 तारखेला यावे आणि सहकार्य करावे.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com