भाजप विधानसभेत गुंडगिरी, मारामारी करतो आहे - BJP is doing Physical fighting and Gundgiri, Mumbai Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजप विधानसभेत गुंडगिरी, मारामारी करतो आहे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले आहे. बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या दिल्या जातात. अशा धमक्या द्यायच्या आणि त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करते आहे. 

मुंबई : जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले आहे. (People given majority to three parties) बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. (Government doing his work with majority) मात्र कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या दिल्या जातात. अशा धमक्या द्यायच्या आणि त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करते आहे.  हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority minister Nawab maliq) यांनी दिला आहे. 

आज विधानसभेत भाजपकडून गुंडगिरी करण्यात आली. यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्व करत होते. ही दुर्दैवी बाब आहे, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.

विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डेटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकार्‍यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता, त्याची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकार्‍यांच्या टेबलकडे गेले. त्यांचा माईक उचलला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय धक्काबुक्कीही केली. यापेक्षा भयानक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा  माईक आणि स्पीकर फोडला असेही मलिक म्हणाले.

अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरुन शिवीगाळही केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती.
...
हेही वाचा...

५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यासाठी विधानसभेत ठराव

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख