भुजबळ, राज गेलेत.. तरीही शिवसेना दिमाखात उभी 

शिवसेनेने अनेक धक्के पचवले. राजसाहेब सेनेतून गेले तेव्हा काहींना वाटले, आता काही खरे नाही.. पण, त्यातूनही शिवसेना सावरली, उभी राहिली.
Gulabrao patil
Gulabrao patil

जळगाव : शिवसेनेने अनेक धक्के पचवले. राजसाहेब सेनेतून गेले तेव्हा काहींना वाटले, (Shivsena digest various shocks. when Raj thakre leave many thought now everything is not allright) आता काही खरे नाही.. पण, त्यातूनही शिवसेना सावरली, (But Shivsena came out of that situation & Stand) उभी राहिली व आजही आपल्यासारख्या युवासैनिकांच्या बळावर दिमाखात उभी आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सेनेच्या कार्याचा गौरव केला. 

शहरातील राजे संभाजी महाराज नाट्यगृहात युवा संवाद कार्यक्रमांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. युवानेते वरुण सरदेसाई यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. तर व्यासपीठावर संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार चिमणराव पाटील, महापौर जयश्री महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. 

नुसती पदे मिरवू नका 
युवासैनिकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव म्हणाले, शिवसेनेला वाटचालीत मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली. भुजबळ, राजसाहेब सेना सोडून गेले. तरीही सेना उभी राहिली. आता तुमची युवासैनिकांची गरज आहे. केवळ कार्डावर छापण्यापुरती पदे घेऊ नका, तर जबाबदारी स्वीकारा. हा काम करत नाही, तो करत नाही, असे म्हूण नका. तर तुम्ही काय केले, याचा विचार करा, असे आवाहनही गुलाबराव पाटलांनी केले. 

युवासंपर्क दौरा सुरु करा 
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वरुण सरदेसाई म्हणाले, मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून आपली सत्ता आहे, विरोधी पक्ष बदलत गेला.. संघर्ष होत गेला, तरीही संघटनेच्या बळावर आपण कायम आहोत. केवळ सत्ता आली म्हणून शांत बसून राहता येणार नाही. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानासाठी बाहेर पडले, तसा युवासंपर्क दौरा सुरु करुन संपर्क वाढवा. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com