बच्चू कडूंनी विचारले, 25 टक्के फी कमी होईल का? - Bacchu Kadu asks, is it possible to reduce 25% fees; State politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

बच्चू कडूंनी विचारले, 25 टक्के फी कमी होईल का?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

राज्यातील पालकांनी खासगी शाळांमध्ये २५ टक्के फी कमी केली जावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांना पत्र लिहून या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 

मुंबई : राज्यातील पालकांनी खासगी शाळांमध्ये २५ टक्के फी कमी केली जावी, (Parents agitaion for 25 % school fees shall reduce) या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल (State minister take cognizance of It) शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी घेतली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांना पत्र लिहून या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्याची २५ टक्के शैक्षणिक फी कपात करण्यासाठी पालकांकडून वेळोवेळी मागणी केली जात आहे. त्यासोबत प्रहार विद्यार्थी संघटनेने यासाठी निवेदने देऊन या विषयावर सरकारकडे मागणी केली आहे, त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करून आपला अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

मंत्री कडू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात कोरोना परिस्थितीमुळे बऱ्याच प्रमाणात पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक फी भरण्याचा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. राजस्थान तसेच दिल्ली या राज्यांतील शाळांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५ टक्के फी कपात करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे कळते. याच धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये पालकांनी २५ टक्के शैक्षणिक शुल्क कपात करण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे या विनंतीस अनुलक्षून तातडीने सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
...
हेही वाचा...

शिवसेनेची `शिवसंपर्क` अभियानातून निवडणुकीची तयारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख