नाना, आमच्याकडे या तुम्हाला निवडून देऊ  !

मी आमदार होतो तेव्हा फक्त देवळाली मतदारसंघाचा होतो. आता मी सबंध महाराष्ट्राचा झालो आहे. अनेक भागातून लोकांचे दुरध्वनी येतात. शक्य होईल ते जनतेचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतो.
Baban Gholap
Baban Gholap

नाशिक रोड : मी आमदार होतो तेव्हा फक्त देवळाली मतदारसंघाचा होतो. आता मी सबंध महाराष्ट्राचा झालो आहे. अनेक भागातून लोकांचे दुरध्वनी येतात. शक्य होईल ते जनतेचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता मी जास्त सक्रीय असुन नगर जिल्ह्यातील लोक मला म्हणतात, नाना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असे शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी `सरकारनामा`ला सांगितले. 

श्री. घोलप शिवसेनेचे लोकप्रिय आमदार म्हणून सबंध महाराष्ट्रात परिचीत आहेत. 1990 ते 2009 असे सलग पाच वेळा ते देवळाली मतदारसंघाचे आमदार होते. 1995 ते 1999 या कालावधीत राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार असतांना ते समाज कल्याण मंत्री होते. सामान्य नागरिक व मतदारांशी थेट नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, लोकसंपर्क हा माझा प्राण आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक भेटायला येतात. आमदार झालो तेव्हा देवळाली मतदारसंघापुरता मर्यादित होतो. त्यानंतर शिवसेनेने माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली. सध्या मी जिल्ह्याबाहेर काम करीत आहे. नगर- नेवासा येथील नागरिक मला सातत्याने संपर्क करीत असतात. कार्यकर्ते भेटायला येतात. विकासकामे, रखडलेले प्रश्न असो वा लोकांची वैयक्तिक स्वरूपाचे भांडणे, कौटुंबिक कलह हे सर्वच प्रश्व सोडवण्याचे काम करावे लागते. सध्या समाजकारण व लोकसेवा ही दोनच कामे करीत आहे. लोकांनी संधी देवो अथवा न देवो समाजसेवा मी अविरत सुरू ठेवणार आहे. 

ते म्हणाले, शिर्डीला खासदारकीची संधी मागच्या वेळेस पक्षाने मला दिली होती.  मात्र लोक अजूनही म्हणतात की, नाना आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही निवडून देऊ. मला नगर जिल्हा सोडून इतर ठिकाणांहूनही फोन येतात. लोकांचे प्रेम, आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे सकाळपासून माझ्या घरी नागरिकांची रीघ लागलेली असते. त्यांच्या समस्या सोडवणे यातच मी व्यस्त असतो. तोच माझा उद्देश आहे. माझ्या खटल्याचा न्यायालयीन निवाडा अद्याप प्रलंबित आहे. तसे जरी असले तरी मी राजकारणात सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजकारण करीत असतो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजपर्यंत लोकसेवेचा वसा मी व माझ्या कुटुंबीयांनी आजपर्यंत सुरू ठेवला आहे. म्हणून माझे कार्यालय सर्वांसाठी खुले असते. 

Edited by Sampat Devgire
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com