पालकत्व घेतल्यावर ते असं मध्येच सोडायचं नसतं, फडणवीससाहेब !

मी नाशिकचा कायापालट करून दाखवतो, असे नाशिकरांना आवाहन करणारा व्हिडिओ ट्विट केला आहे.
After 22 patients died due to lack of oxygen, Congress tweeted an old video and criticized Devendra Fadnavis
After 22 patients died due to lack of oxygen, Congress tweeted an old video and criticized Devendra Fadnavis

मुंबई : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात बुधवारी (ता. २१ एप्रिल) घडलेल्या दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नाशिक पालिकेत सध्या भारतीय जनता पक्ष सत्तेवर असून पालिका निवडणुकीतील एक व्हिडिओ ट्विट करत काँग्रेस पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पालकत्व घेतल्यावर ते असं मध्येच सोडायचं नसतं देवेंद्र फडणवीस साहेब,’ अशी कॅप्शन लाइन देत फडणवीसांना त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. 

ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे पुरेशा ऑक्सिजन न मिळाल्याने बुधवारी (ता. २१ एप्रिल) नाशिक येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. डॅा. हुसेन रुग्णालयात शंभरहून अधिक कोरोना रुग्ण होते. त्यांच्यासाठी येथे नव्याने एक किलो लिटरचा (एक टन) क्षमतेचा सिलिंडर बसविण्यात आला होता. बुधवारी सकाळी त्यात फिलींग करताना गॅस गळती झाली. त्यामुळे रुग्णालयातील व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने हे २२ रुग्ण दगावण्यात आल्याचे नाशिकच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात आहे. त्यावरून आता राजकारण रंगले आहे. काँग्रेस पक्षाने नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतील देवेंद्र फडणवीस यांचा मला सत्ता द्या; मी नाशिकचा कायापालट करून दाखवतो, असे नाशिकरांना आवाहन करणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. 

त्या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की, देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, आता नाशिक बदललं पाहिजे. अनेक लोक असं म्हणतायत की आमच्या नाशिककडे पाहणारे कोणी नाही. नाशिकचा कोणी वाली नाही, असेही म्हटलं जातंय. आम्ही वेगवेगळ्या नेत्यांवर विश्वास टाकला. पण, नाशिकला कोणी काही दिलं नाही. मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. माझ्यावर एकदा विश्वास टाका. मी घोषणा करतो की आजपासून मी हे नाशिक दत्तक घेतो. काहीजण म्हणतात की मी नागपूरचा असल्याने नागपूर दत्तक घेतले आहे. पण, नागपूरसाठी आमचे गडकरीसाहेब पुरेसे आहेत. मला नागपूरकडे जायची आवश्यकता नाही. आजपासून माझं दत्तक गाव हे नाशिक असेल आणि येत्या पाच वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलून दाखवीन आणि ते नाही केलं तर पाच वर्षांनंतर तोंड दाखवायलाही येणार नाही, अशी भीमगर्जना केली होती.  

तोच प्रचारातील व्हिडिओला ट्विट करत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्या व्हिडिओला ‘पालकत्व घेतल्यावर ते असं मध्येच सोडायचं नसतं देवेंद्र फडणवीस साहेब,’ अशी कॅप्शन लाइन देत फडणवीसांना खोचक टोमणाही मारला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com