हायकोर्टाने खडसावले...वसई-विरारमध्ये 9000अवैध बांधकामे!

उच्च न्यायालयानेच येत्या दोन आठवड्यात कशी कारवाई करणार, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Vasai-Virar
Vasai-Virar

विरार : वसई- विरार महानगरपालिका सातत्याने अनधिकृत बांधकामामुळे चर्चेत राहिली आहे. (Vasai-Virar corporation continuesly in discussion for Unauthorized construction) काही दिवसापूर्वी पालिकेतील सहायक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तच  पुढाकार घेत असल्याचा आरोप केल्याचा आरोप गाजला होता. (ast. commissioner blaim Adl. Commissioner protect Unauthorized construction) आता उच्च न्यायालयानेच येत्या दोन आठवड्यात कशी कारवाई करणार, याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (High court ordered to submit affidavit) त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसई- विरार महापालिकेच्या हद्दीत वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात वसईतील टेरेन्स हॅन्ड्रिक्स यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी आज मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्त आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाचे पुढे झाली. 

यावेळी न्यायालयाने या विषयावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले कि, अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. हे असेच सुरु राहिले  तर वसई-विरार महापालिका आम्ही विसर्जित करू. निवडणुका तरी कशाला हव्यात? पालिका हद्दीत तब्बल नऊ हजार इमारती या पूर्णपणे बेकायदा आहे, असे महापालिकेनेच मान्य केले आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला.  

करोना संकटामुळे वसई-विरार महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. गेल्या वर्षभरापासून लोकप्रतिनिधी नसल्याने अनधिकृत बांधकामे वाढल्याचा आरोप होत आहे. सध्या या महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती असल्याचे महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. 

जून २०२० पासून या महापालिकेच्या आयुक्तांचा कारभार  प्रशासक पाहत आहेत.. त्यामुळे प्रशासकांनी या बेकायदा बांधकामांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत. कशी कारवाई करणार याविषयी दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने प्रशासकांना दिले आहेत. पालिकेच्यावतीने अॅड स्वाती सागवेकर यांनी बाजू मांडली.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com