सचिन वाझेंची होऊ शकते हत्या! नवनीत राणांचा खळबळजनक दावा

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीतून राष्ट्रीय तपास यंत्रणे (एआयए)ला दररोज नवीन माहिती मिळत आहे.
Sachin vaze having death threat says MP Navneet rana
Sachin vaze having death threat says MP Navneet rana

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीतून राष्ट्रीय तपास यंत्रणे (एआयए)ला दररोज नवीन माहिती मिळत आहे. हे प्रकरण मातोश्रीपर्यंत जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारभोवती या प्रकरणाचे धागेदोरे जात आहेत. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्याप्रकणारे वाझेंचीही हत्या होऊ शकते, असा खळबळजनक दावा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासात दररोज नवीन खुलासे होत आहेत. काल मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंगची यांचीही बदली करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांनीही वाझे यांना कटात मदत केल्याचा आरोप होत आहे. 

याविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, एनआयएने सचिन वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले नाही तर त्यांचा मनसुख हिरेन होण्यापासून जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे एनआयएने वाझेंना मुंबई पोलिसांपासून वाचवावे, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. पुढील काही दिवसांत मातोश्रीपर्यंत जाणाऱ्या अनेक मोठ्या नेत्यांची नावे चौकशीत बाहेर येतील. कारण मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि इतर घडीमोडींवरून हे स्पष्ट होते की मोठ्या नेत्यांचा या प्रकरणात सहभाग आहे, असे दावा राणा यांनी केला.

सचिन वाझेंनी एनआयएला जी माहिती दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मोठा विस्फोट होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना दुर सारून प्रकरण संपणार नाही. सचिन वाझेला हा कट रचण्यासाठी कुणी पुढे केले, याचे धागेदोरे समोर येतील. हिरेनचा खून झाला त्याप्रमाणे वाझेंच्याही जीवाला धोका आहे. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या आजूबाजुला फिरत आहोत. या प्रकरणात मातोश्रीचे नावही येऊ शकते. त्यामुळे वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवले पाहिजे, असे रवी राणा म्हणाले. 

दरम्यान, पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना परत घेण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याआधारे भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेच सचिन वाझेचे राजकीय बॉस असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल करत निलंबित वाझे यांना पोलिस दलात पुन्हा घ्यावे, यासाठी २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, शिवाय त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट केला.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com