Big Breaking अकोला, अमरावती, यवतमाळला पुन्हा लाॅकडाऊनची शक्यता - Lock Down May be imposed in Akola Amravati today due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

Big Breaking अकोला, अमरावती, यवतमाळला पुन्हा लाॅकडाऊनची शक्यता

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

आज अमरावती, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा कोरोना स्थितीचा आढावा घेतला असून या भागात कर्फ्यू अथवा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचीत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वेळात अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : आज अमरावती, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा कोरोना स्थितीचा आढावा घेतला असून या भागात कर्फ्यू अथवा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचीत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वेळात अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अनेक ठिकाणी कुठलीही बंधने पाळली जात नाहीत. ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. मुंबईपेक्षाही जास्त रुग्ण यवतमाळ मध्ये आहेत. लोक मास्क वापरायला तयार नाहीत. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. अमरावती, नागपूर विभागात परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग एकीकडे देशात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत असतानाच, महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणांपुढे एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे नियंत्रणात आलेल्या परिस्थितीवर असणारी पकड अशीच ठेवण्यासाठी आता राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागल्या आहेत. असे असले तरीही अमरावती जिल्ह्यात मात्र नाईलाजास्तव संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अमरावती जिल्ह्यात हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले गेले असून, या आदेशांअंतर्गत सर्व दुकाने आणि सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. केवळ गर्दीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संचारबंदीचे आदेश लागू करुन सुद्धा गर्दी नियंत्रणात येत नल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख